Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Miss Universe Benefits: जाणून घ्या, मिस युनिव्हर्सला कोणत्या 10 सुविधा दिल्या जातात?

Miss Univerhttp://www.indiatvnews.com/se Benefits

Miss Universe Facilities: अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात मिस युनिव्हर्स 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अमेरिकेच्या 'आर बॉनी ग्रॅबियल'ने मिस युनिव्हर्सचा ताज पटकविला. सोबतच तिला अनेक शानदार सुविधादेखील मिळाल्या. चला, तर मग मिस युनिव्हर्सला ताजसहित इतर कोणत्या सुविधांचा लाभ मिळतो हे पाहूयात.

Miss Universe Facilities: मिस युनिव्हर्स 2022 चा किताब अमेरिकेची ‘आर बॉनी ग्रॅबियल’(R'Bonney Gabriel ) हिने जिंकला. या आनंदाच्या क्षणी भारताची माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हिने मिस युनिव्हर्सचा ताज स्वतःच्या हातांनी तिच्या डोक्यावर सजविला. तसेच तिला ताज व्यतिरिक्त इतर 10 सुविधादेखील मिळाल्या आहेत. चला, तर मग मिस युनिव्हर्सला ताजसहित इतर कोणत्या सुविधांचा लाभ मिळतो हे जाणून घेवुयात. 

ताज (The Crown)

मिस युनिव्हर्सचा किताब पटकविणाऱ्या विजेतीच्या डोक्यावर ताज चढविण्यात येतो. यानंतर मिस युनिव्हर्स हा ताज रिटर्न करणार का स्वत: जवळ ठेवणार असा एक करार केला जातो. मात्र, बहुतेक मिस युनिव्हर्स ताज स्वत:जवळ ठेवणे पसंत करतात. या ताजची किंमत साधारण कोटींच्या घरात असते. 

प्राइज मनी (Prize Money)

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेल्या स्पर्धकाला प्राइज मनी साधारणपणे एक लाख रूपयाची रक्कम ही प्राइज मनी स्वरूपात दिली जाते.

स्कॉलरशिप (Scholarship)

स्कॉलरशीप (शिष्यवृत्ती) मिस युनिव्हर्स बनलेल्या माॅडेलदेखील स्कॉलरशीप दिली जाते. ही स्कॉलरशीप न्यूयॉर्क फिल्म अकादमीतर्फे व्हिज्युअल परफॉर्मिंग आर्ट्समधील विजेत्याला देण्यात येते.

पोर्टफोलिओ (Portfolio)

मिस युनिव्हर्सच्या विजेत्या झालेल्या स्पर्धकाचा मिस युनिव्हर्सचा मॉडेलिंग पोर्टफोलिओ तयार करण्यात येतो.

पगार (Salary)

 मिस युनिव्हर्सला एक वर्षाचा पगारही देण्यात येतो. हा पगार तिचा साधारण डॉलरमध्ये असतो.

स्पेशल अलाउंस (Special Allowance)

मिस युनिव्हर्सला स्पेशल अलाउंस (विशेष भत्ता) देखील देण्यात येतो. तसेच एक प्रेरणात्मक व्यक्ती म्हणून मिस युनिव्हर्स बनल्यानंतर तिला जगभरात सामाजिक कार्यासाठी जावे लागते. यासाठी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनचे स्पाॅन्सर सर्व खर्च करतात.  

न्यूयॉर्कमध्ये अपार्टमेंट (Apartment in New York)

मिस युनिव्हर्सला वर्षभर राहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एक अपार्टमेंटदेखील दिला जातो.

ट्रीटमेंट (Treatment)

खरं तर, मिस युनिव्हर्सला सर्व ट्रीटमेंटच्या सुविधा  फ्री मध्ये पुरविल्या जातात. यामध्ये फॅशन स्टायलिस्टपासून ते न्यूट्रीशन, डर्मेटोलॉजी(त्वचासंबंधित) व डेंटल सर्व्हिसचा समावेश असतो.

सर्व ठिकाणी फ्री एंट्री (Free Entry to All Venues)

मिस युनिव्हर्सला सर्व ठिकाणी मोफत प्रवेश दिला जातो. या सुविधेमध्ये सर्व विशेष कार्यक्रम, पार्ट्या, प्रीमियर्स, स्क्रीनिंग, हाॅटेल व ट्रॅवलचा समावेश आहे.

मिस युनिव्हर्सची जबाबदारी(Responsibilities of Miss Universe)

मिस युनिव्हर्सला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कारण ती मिस युनिव्हर्सची ब्रॅंड अॅम्बेसेंडर असल्याने तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. यामध्ये Miss Universe Organization व्दारे आयोजित करण्यात आलेल्या सर्व पार्टीज्, प्रेस कॉन्फ्रेंस, चॅरिटी इवेंट्स आदि कार्यक्रमात सहभागी होणे अनिवार्य असते.