धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज हे लोकांच्या मनातल्या गोष्टी ओळखत असल्याचा दावा केला जात आहे. त्यांचे याबाबतचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ते सिद्ध करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. सुहानी शाह यांनीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्याप्रमाणेच कोणताही प्रश्न वगैरे न विचारताच त्यावरचं उत्तर आधीच लिहून ठेवण्याचं प्रात्याक्षिक एका वृत्तवाहिनीवर करून दाखवल होत. अशाच प्रकारचे सुहानीचे व्हिडिओही व्हायरल होऊ लागले. मात्र, सुहानी शाह यांच्यापेक्षा आपण वेगळे असल्याचा दावा धीरेंद्र महाराज यांनी याबाबत केला आहे. यामुळे सुहानी शाह चर्चेत आल्या आहेत. सुहानी ही एक कला असल्याचे मानते. तिच्या यू ट्यूब चॅनेलवर या प्रकारचे व्हिडिओ आहेत.
सुहानी शाहने एक भारतीय महिला जादूगार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 1997 पासून संपूर्ण देशभरात तसेच परदेशात जादूचे स्टेज शो ती करत आहे. याशिवाय ती तिच्या 'Suhani Shah' या यूट्यूब चॅनेलद्वारे लोकांना आपल्या कलेने थक्क करत असते. राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये 1990 मध्ये तिचा जन्म झाला. 29 जानेवारी परवाच तिचा 33 वा वाढदिवस आहे. जेमतेमच असणारे शालेय शिक्षण तरीही स्वत:मधली कला गवसली आणि आज ती कला विकसित करत करत आज सुहानीने मोठी मजल गाठली आहे. तिच्या यू ट्यूब चॅनेलला 3.42 मिलियन इतके subscriber आहेत. 5 हजारांहून अधिक मॅजिक स्टेज शो तिने भारतात व जगभरात केले आहेत.
सुहानी शाहची यू ट्यूब कमाई किती?
सुहानीला शो, स्पॉन्सरशिप आणि यूट्यूबवरून कमाई होत असते. यू ट्यूबवर तिचे 3 मिलियनपेक्षा जास्त subsciber आहेत. एवढे subscriber आणि views असताना अफिलीएट मार्केटिंगचा पर्याय स्वीकारल्यास त्यातूनही खूप सारी कमाई करता येते. याशिवाय स्पॉन्सरशिपच्या संधीही बऱ्याच निर्माण होत जातात.
सोशल ब्लेडच्या आकडेवारीप्रमाणे गेल्या महिनाभरात तिला रोज सरासरी 11 लाख 54 हजार 784 इतके व्यूज मिळत आहेत. Subscribers मध्येही रोज सरासरी 4 हजाराने वाढ होत आहे. रोज सरासरी 289 ते 4.600 डॉलर या दरम्यान तीची यू ट्यूबमधून होणारी अंदाजित कमाई आहे. सोशल ब्लेडच्या एकूणच आकडेवारीपैकी earning च्या बाबतीत केवळ गुगल AdSense द्वारे कमाल आकडा कमाल आकडा विचारात घेतला तर हा आकडा बरेचदा वास्तवात गाठला गेल्याचे दिसत नाही. मात्र किमान आकड्याच्या पुढे ही मिळकत असल्याचे बघायला मिळते. डॉलरचा आताच भाव 81.65 इतका आहे. म्हणजे दिवसाला 289 डॉलरचा हिशेब केला तर 23 हजार 596 इतके रुपये तिला रोज यातून मिळतात. आठवड्यला 1 लाख 65 हजार 178 तर महिनाभरात 7 लाख 7 हजार 880 रुपये तिला याप्रकारे मिळतात.