How Much You Should Save: पैशांची बचत करण्यासाठी युवा पिढीला घरातील वडिलधाऱ्या माणसांकडून नेहमी सांगितले जाते. मात्र बरेचजण या गोष्टी फार गांभिर्याने घेत नाहीत. नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन जोवर हातात असते, तोपर्यंत सगळं सुरळीत सुरु असतं. पण जेव्हा हातातून हे उत्पन्नाचे साधन जाते. त्यावेळी मात्र परिस्थिती अवघड होऊन बसते. कारण आपण भविष्याच्यादृष्टीने योग्य आर्थिक नियोजन केलेले नसते. वयाची 30 वर्ष पूर्ण होण्याआधी तुमच्याकडे किती बचत असावी. याचे उत्तर तुमचे सध्याचे उत्पन्न, खर्च, जीवनशैली आणि आर्थिक उद्दिष्टे आदी घटकांवर अवलंबून आहे. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
Table of contents [Show]
आपत्कालीन निधी (Emergency Fund)
तुमच्याकडे किमान 6 ते 12 महिन्यांचा आपत्कालीन निधी साठविलेला असावा. हा निधी तुमची नोकरी गेल्यास, वैद्यकीय अडीअडचणीच्या वेळी किंवा अनपेक्षित घटनांच्या बाबतीत कधीही गरज भासल्यास तुमच्या उपयोगी पडतो.
सेवानिवृत्तीची बचत (Saving for Retirement)
तुम्हाला शक्य तितक्या लवकर सेवा निवृत्तीसाठी बचत सुरु करणे महत्वाचे आहे. वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत, तुमचा निवृत्ती निधी म्हणून, तुमच्या वर्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम वाचवण्याचे ध्येय ठेवावे. तुमची सेवा निवृत्तीची बचत जेवढी जास्त, तेवढं आरामशीर आयुष्य तुम्ही पूढे जगू शकाल.
कर्जाची परतफेड (Loan Reimbursement)
जर तुमच्यावर क्रेडिट कार्ड किंवा कुठलेही वैयक्तिक कर्ज असेल, तर बचतीची रक्कम वाढविण्यापूर्वी त्या कर्जाची परतफेड करण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण कुठल्याही कर्जावरील वाढत जाणारी कर्जाची रक्कम ही आपल्याला चिंतेत भर टाकत असते.
विविध उद्दिष्टे पूर्ण करण्यास बचत करा (Saving)
जर तुमची काही आर्थिक उद्दीष्टे आहेत, जसे की घर खरेदी करणे किंवा व्यवसाय सुरु करणे,यासाठी तुम्ही स्वतंत्रपणे बचत करा. उद्दिष्ट जेवढे मोठे तेवढी मोठी बचत असायला हवी.
हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवा (Health Insurance)
उत्तम आरोग्यासाठी जशी गुंतवणूक करता येते, तशीच उत्तम गुंतवणूक हेल्थ इन्शुरन्समध्येही केली पाहिजे. केव्हाही आरोग्य बिघडलं, गंभीर आजार झाला,अपघात झाला तर तुमच्याजवळ अशा वेळेसाठी आर्थिक तजवीज केलेली असली पाहिजे.
गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका (No More Loan)
कर्ज घेताना विचारपूर्वक घ्या. तुम्हाला जितक्या रकमेची गरज आहे, तेवढेच कर्ज घ्या. गरजेपेक्षा अधिक कर्ज कधीच घेऊ नका. तसंच, तुम्ही जितकं परत करू शकाल तितकंच कर्ज घ्या. कारण,जर तुम्ही वेळेवर इन्स्टॉलमेंट भरू शकला नाहीत,तर तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच जाईल आणि तुम्ही डीफॉल्टर झालात तर भविष्यात कधीही तुम्ही कर्ज घेऊ शकणार नाही. एकदा का तुमचा क्रेडिट स्कोअर खराब झाला किंवा तुम्ही डीफॉल्टर च्या लिस्ट मध्ये गेले, त्याचा परिणाम आयुष्यावर होईल.