Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Expenditure of State Govt: काल मंत्रिमंडळात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवर राज्य सरकार किती खर्च करणार?

Expenditure of State Govt, State Government Expenditure on Development Works

Image Source : http://www.en.wikipedia.org/

Expenditure of State Govt: केंद्र सरकार व राज्य सरकार (Central Government and State Government)कडून अनेक महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात येत आहे. गावोगावी इंटेरनेटच्या सुविधा वाढवणार हा सुद्धा महत्वाचा निर्णय काल घेण्यात आला. काल घेण्यात आलेले निर्णय कोणते? निर्णयांना किती खर्च लागणार? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Expenditure of State Govt: काल (मंगळवार) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet meeting)11 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सगळीकडे साजरा केला जात आहे, त्याबरोबरच शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुद्धा राबविल्या जात आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार कडून अनेक महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात येत आहे. गावोगावी इंटेरनेटच्या (internet) सुविधा वाढवणार हा सुद्धा महत्वाचा  निर्णय काल घेण्यात आला. काल घेण्यात आलेले निर्णय कोणते?  निर्णयांना किती खर्च लागणार याबाबत जाणून घेऊया.

कोणते निर्णय घेण्यात आले?

  • गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार. 
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार
  • दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांगकल्याण विभाग स्थापन करणार. 
  • अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या 826 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता.
  • नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या 169.14  कोटी खर्चास सुधारित मान्यता. 
  • बीड (Beed) जिल्ह्यातील आश्रमशाळेस अनुदानित तत्वावर मान्यता. 
  • शासकीय कर्मचाऱ्यांना 2006 ते 2008 या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीच्या आगाऊ वेतनवाढीचा (Advance salary increment) लाभ देणार. 
  • महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (Maharashtra Forest Development Corporation) कर्मचान्यांना व्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती.
  • अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना काही सेवाविषयक लाभ देणार, अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करणार.
  • सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद (Solapur-Tuljapur-Osmanabad) हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर राज्य शासनाची 452 कोटी 46 लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.
  • प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना 1 हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क (Stamp duty) आकारणार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्याना होणार फायदा.

अंदाजे खर्च किती करणार? (How much will it cost?)

  • अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्प (Vasani Madhyam Project)
  • नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्प (Kordinala Project)
  • सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद  ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅक Solapur (Tuljapur-Osmanabad Broad Gauge Railway Line Fast Track)

या तीन प्रकल्पाला जवळपास 2 हजार कोटी 46 लाख इतका खर्च होण्याची शक्यता आहे. इतर निर्णयांसाठी 5 हजार कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकूण या सर्व योजणांना अंदाजे 10 हजार कोटी रुपये इतका खर्च लागण्याची शक्यता आहे. शिंदे - फडणवीस (Shinde - Fadnavis) सरकारने सत्तेत आल्यापासून 700 हून अधिक महत्वाचे निर्णय घेतले अशी माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर 100 कोटीहून अधिक खर्च करण्याचे आश्वासनही दिले आहे. 2021-22 च्या जिल्हा वार्षिक योजनांसाठी मार्च 2022 मध्ये एकूण  567.8 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केलेली होती. हा निधी झाल्यानंतर 566. 51 कोटी निधी विविध विकास कामांसाठी खर्च झाला अशी माहिती मिळाली आहे.