Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share market returns : ऑटोमोबाईल सेक्टरने यावर्षी दिला ‘असा’ परतावा

Share market returns

वर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

ऑटोमोबाईल सेक्टरसाठी यंदाचे वर्ष अनेक कारणासाठी आव्हानात्मक होते. त्यातून सावरत या सेक्टरने कशी प्रगती केली. अर्थातच या घडामोडींचा शेअर मार्केटमवर कसा परिणाम झाला आणि यावर्षी ऑटोमोबाईल सेक्टरने Share returns किती दिले ते जाणून घेऊया.

 ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मोटर व्हेइकल, तसेच इंजिन, ऑटो लाइट, टायर अशा घटकांच्या कंपनीचाही समावेश होतो. जानेवारी ते डिसेंबरचा पहिल्या आठवड्यातील 6 तारखेपर्यंतची कंपन्याची NIFTY मधील कामगिरी याठिकाणी विचारात घेण्यात आली आहे. यामध्ये Tube Investment, TVS motors, M&M, MRF, Eicher Motors या कंपन्यांनी यावर्षी  चांगली कामगिरी केली आहे. ऑटोमोबाइल सेक्टरने 16. 73 टक्के इतके Shar returns दिले आहेत. 

ऑटोमोबाईल क्षेत्रासमोरील आव्हाने(Automobile sector challenges)

हा परतावा (रिटर्न्स) आकर्षक दिसत असला तरी ऑटोमोबाईल सेक्टरसाठी हा प्रवास सोपा नव्हता. 2016 या वर्षी झालेली नोटबंदी तसेच 2020 पासून सुरू झालेले लॉकडाउन या क्षेत्रासाठी आव्हानात्मक ठरले. या घडामोडी जुन्या असल्या तरी त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी ऑटोमोबाईल सेक्टरसमोर आव्हान उभे झाले. लॉकडाउनमधून बाहेर पडत असताना सेमी कंडक्टर चिपची कमतरता निर्माण होऊ लागली. यातच यंदा रशिया- यूक्रेन प्रश्न चिघळला. याचा परिणाम झाला. कच्च्या मालाच्या किनाती यामुळे वाढू लागल्या. अशा अनेक समस्यांच्या गर्तेत ऑटोमोबाईल सेक्टर अडकले होते. 

मार्चनंतर प्रगती 

मार्च 2022 नंतर ऑटोमोबाईल क्षेत्र यातून बाहेर येऊ लागले. सेमी कंडक्टर चिपच्या कामतरतेचा प्रश्नावर मार्ग निघाला. EV (electric vehicle) ला असणारा सरकारचा पाठिंबा देखील या क्षेत्रासाठी हितकारक ठरताना दिसून आले.  

ऑटोमोबाईल क्षेत्राचे भविष्य  (Automobile sector future)

अनेक आव्हानातून बाहेर येत असताना ऑटोमोबाईल क्षेत्राचे भविष्य देखील चांगले असण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. EV ला असणारा सरकारी पाठिंबा हे एक त्याचे कारण आहेच. त्याचबरोबर 7.50 लाख कोटीवरून 15 लाख कोटीपर्यंत हे क्षेत्र पुढील 5 वर्षात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तसेच 2026 पर्यंत भारत ऑटो सेक्टरमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मार्केट होण्याची शक्यता आहे. यावरुन ऑटोमोबाइल सेक्टरचे भवितव्य चांगले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.