भारतीय फुटबॉल टीम (Indian National Football Team) फिफा वर्ल्ड कपमध्ये (FIFA Football World Cup) नेमकी कधी खेळेल हे सांगता येत नाही. पण, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने फिफा वर्ल्ड कपच्या (FIFA Football World Cup) माध्यमातून एक मोठी गोष्ट साध्य केलीय. फिफा वर्ल्ड कपचे टीव्ही आणि डिजिटल राईट्स (TV & Digital Rights) अंबानींच्या रिलायन्स जिओ या कंपनीकडे होते. त्यांनी टीव्हीवर MTv या वाहिनीवर तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमावर (Jio Cinema) फुटबॉल सामने लाईव्ह दाखवले.
आणि या सामन्यांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अख्खी स्पर्धा तब्बल 11 कोटी ग्राहकांनी ऑनलाईन पाहिली. जिओ सिनेमा या रिलायन्स जिओच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) सामने विनामूल्य उपलब्ध होते. आणि फक्त फायनल बद्दल बोलायचं तर जिओ सिनेमावर 3 कोटी 20 लाख लोकांनी फायनल बघितली. हा आकडा टीव्हीपेक्षाही जास्त आहे.
आणि महत्त्वाचं म्हणजे, जागतिक स्तरावरही ऑनलाईन फुटबॉल पाहणाऱ्या लोकांमध्ये आता भारताचा क्रमांक चक्क पहिला आहे. भारत ही फिफा वर्ल्ड कपची सगळ्यात मोठी डिजिटल बाजारपेठ ठरली आहे. जिओ सिनेमाने दिलेली इतर आकडेवारी बघितली तर, स्पोर्ट18 आणि जिओ सिनेमा मिळून 40 अब्ज मिनिटं लोकांनी फुटबॉलचा आनंद लुटला. आणि स्पर्धा सुरू असताना जिओ सिनेमा हे अॅप कायम अॅप डाऊनलोड करण्याच्या स्पर्धेत अव्वल होतं.
जिओ STB, अॅपल टीव्ही, अॅमेझॉन फायर स्टिक, सोनी, सॅमसंग, एलजी आणि शिओमी अशा सगळ्याच कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमाला सपोर्ट केलं.
फुटबॉल सामने 4K दर्जाचा व्हीडिओ उपलब्ध होता. आणि सामन्यांदरम्यान समालोचन करण्यासाठी वेन रुनी (Wayne Rooney), लुईस फिगो (Luis Figo), रॉबर्ट पायरेस (Robert Pieres), गिल्बर्टो सिल्वा (Gilberto Silva)आणि सोल कँपबेल (Sol Campbell) असे दिग्गज आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूही होते. हा अनुभव प्रेक्षकांनी उचलून धरला.
‘जागतिक स्पर्धा लोकांना कमीत कमी खर्चात पाहता याव्यात, असाच आमचा प्रयत्न होता. आणि ते फिफा वर्ल्ड कप2022 मधून आम्ही साध्य केलं. आता भारताची सहभाग नसताना सगळ्यात जास्त पाहिल्या गेलेल्या स्पर्धेत या वर्ल्ड कपची गणना केली जाईल. पुढेही फुटबॉलच्या प्रसिद्ध लीगचं प्रक्षेपण आम्ही सुरूच ठेवू,’ असं वायकॉम18 स्पोर्टेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जयराज यांनी सांगितलं.
प्रेक्षकांसाठी सामने विनामूल्य होते. पण, जिओ कंपनीने या प्रक्षेपणातून 50 आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आपल्याशी जोडले. आणि त्यातून पैसेही कमावले.