बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. एकापाठोपाठ एक दमदार आणि बिग बजेट सिनेमे (Big Budget Film) तो सध्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय. नोव्हेंबर 2022 मध्ये आलेला ‘दृश्यम 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता अजयचे ‘भोला’ आणि ‘मैदान’ हे दोन चित्रपट सध्या चर्चेत आहेत. त्यापैकी भोला (Bhoola) हा चित्रपट गुरुवारी (30 मार्चला) देशभरात प्रदर्शित झालाय. ज्याला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळतंय.
अशातच त्याच्या आगामी ‘मैदान’ (Maidaan) या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगलीये. नुकताच त्याचा टिजरही प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट देखील बिग बजेट असून यामध्ये अजयने फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. त्यासाठी त्याने किती मानधन घेतलंय आणि एकूणच चित्रपटाचं बजेट काय? याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
मैदानचा टिजर रिलीज
अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘मैदान’ चा टिजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा (Amit Sharma) यांनी केले असून त्याला संगीत ए. आर. रहमान (A.R. Rahman) यांनी दिले आहे. हा चित्रपट हिंदीसह इतर 3 प्रादेशिक भाषांमध्ये संपूर्ण देशभरात 23 जूनला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात अजय सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणी (Priyamani) सय्यद अब्दुल रहीम यांच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजेच अजयची सिनेमातील पत्नी म्हणून पाहायला मिळेल. याशिवाय नितांशी गोयल, आर्यन भौमिक,गजराज राव आणि रुद्रनील घोष यासारख्या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.
‘मैदान’ एक बिग बजेट फिल्म
2023 मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘मैदान’. जनभारत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार मैदानचे एकूण बजेट 100 करोड रुपयांचे आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. महत्त्वाचं म्हणजे मैदानच्या टिजरवरून असे समजते की, या चित्रपटाचे कथानक हे 1952 ते 1962 च्या काळातील फुटबॉलच्या होणाऱ्या स्पर्धांवर रेखाटण्यात आले आहे.
कलाकारांनी घेतले ‘इतके’ मानधन
या चित्रपटात अजयने फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. tellyChakkar.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या भूमिकेसाठी अजयने 30 कोटी रुपये मानधन घेतले आहे. याशिवाय सहकलाकार प्रियमणी हिने चित्रपटातील भूमिकेसाठी 2 कोटी रुपये घेतले आहे.
यासोबतच नितांशी गोयल हिने सय्यद अब्दुल रहीम यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. यासाठी तिने 35 लाखाचे मानधन घेतले आहे. तर अभिनेता आर्यन भौमिक याने या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी 20 लाख रुपये घेतलेत. गजराज राव यांना देखील या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यातील भूमिकेसाठी त्यांना 85 लाखांचे मानधन मिळाले आहे. तर रुद्रनील घोष यांना 20 लाखाचे मानधन मिळाले आहे.