सिंघम चित्रपटाच्या यशानंतर अजय देवगणचा (Ajay Devgn) भला मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याचा दृश्यम- 2, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आत्ता, म्हणजेच 2023 या वर्षात आज (30 मार्चला) श्रीराम नवमीच्या निमित्ताने त्याचा ‘भोला’ (Bholaa) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
अजयचा हा चित्रपट ‘कैथी’ (Kaithi) या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असून ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटानंतरचा बॉलीवूडमधील सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा आहे. चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाल्याने एक आगाऊ दिवस आणि मोठा विकेंड चित्रपटासाठी मिळणार आहे. आजच्या लेखात आपण भोलाच्या पहिल्या दिवसाच्या कमाई बद्दल जाणून घेऊयात.
बिग बजेट फिल्म ‘Bholaa’
www.mtwikiblog.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार भोला हा चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’ नंतरचा सर्वात मोठा बिग बजेट प्रोजेक्ट आहे. याचे एकूण बजेट 100 करोड रुपये आहे. त्यापैकी 80 करोड रुपये हे प्रोडक्शन बजेट असून उर्वरित 20 करोड रुपये हे मार्केटिंग आणि जाहिरातींवर खर्च करण्यात आले आहे.
दृश्यम - 2 नंतरचा अजयचा हा पहिलाच चित्रपट असून त्याला प्रेक्षकांचे जास्त प्रेम मिळेल आणि त्याची ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटापेक्षा जास्त कमाई होईल असा अंदाज बांधला जात आहे.
‘Bholaa’ची आत्तापर्यंतची कमाई किती?
Zoomtventertainment.com ने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने देशभरात 14,000 तिकिटांची यशस्वी विक्री केली आहे. भोलाने आतापर्यंत 3.19 कोटी रुपयांची कमाई केली असून तज्ञांच्या मते, भोला लवकरच ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आहे.
ट्रेंड एनालिस्ट गिरीश वानखडे (Girish Vankhede) यांनी भोला हा चित्रपट चांगली कमाई करेल, असे मत मांडले आहे. मुळात हा ‘कैथी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. याशिवाय अजय देवगण हा चांगला अभिनेता असल्याने त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. त्यामुळे लोकांचा प्रतिसादही त्याच्या चित्रपटाला मिळेल आणि आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट 15 करोड रुपये कमवण्यात यशस्वी होईल, असे गिरीश वानखडे यांनी म्हटले आहे.
‘दसरा’ चित्रपट भोलाचा प्रतिस्पर्धी
‘कैथी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा ‘भोला’ हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. महत्त्वाचे म्हणजे भोला IMAX आणि 3D फॉरमॅटमध्ये रिलीज करण्यात आला आहे. सध्या चित्रपटगृहात भोलाला ‘दसरा’ हा चित्रपट प्रतिस्पर्धी आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा आहे. दसरा हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई कोण करेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.