Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बचत खात्यातील व्याजावर टॅक्स कसा लावला जातो?

बचत खात्यातील व्याजावर टॅक्स कसा लावला जातो?

बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस (TDS) लागू नसला तरी, बचत खात्यातून मिळणारे उत्पन्न हे करपात्र (Taxable) असते.

बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस (TDS) लागू नसला तरी, बचत खात्यातून मिळणारे उत्पन्न हे करपात्र (Taxable) असते. अनेक जणांना याबद्दल माहिती नसल्यामुळे मुदतीपेक्षा जास्त व्याज मिळाल्यास त्यावर टॅक्स (Tax on Interest) लागू शकतो. मिळालेल्या एकूण बचत खात्यातील (Saving Account) व्याजाच्या उत्पन्नावर तुम्ही 10 हजार रुपयांपर्यंत टॅक्स सवलत मिळवू शकता. ही सवलत इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80TTA आणि 80TTB या अंतर्गत मिळू शकते आणि ही सवलत कोणीही वैयक्तिक व्यक्ती आणि एचयूएफ (हिंदू अविभक्त कुटुंब) यांच्यासाठी उपलब्ध आहे.

जर तुम्हाला तुमच्या बचत खात्यातून 10 हजार रूपयांपेक्षा कमी व्याज मिळत असेल तर तुम्हाला त्यावर टॅक्स भरावा लागणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही एकापेक्षा अधिक बचत खाती सुरू ठेवून त्यातून मिळणाऱ्या व्याजाचा टॅक्स सवलतीसाठी लाभ घेऊ शकता. कारण इथे एका खात्यातून किंवा 10 खात्यातून मिळणारे व्याज एकत्रित केले जाते आणि ते जर 10 हजार रूपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला त्यावर टॅक्स भरावा लागेल.

10 हजार रूपयांपर्यंत टॅक्स सवलत!

एका वर्षात बचत खात्यातून व्याज म्हणून 10 हजार रूपयांपर्यंतच्या रकमेवर टॅक्स सवलत लागू होते. या 10 हजार रूपयांमध्ये एखाद्या व्यक्तीने किंवा एचयूएफकडे असलेल्या सर्व सेव्हिंग बँक खात्यातून मिळालेल्या सर्व व्याजाच्या रकमांचा समावेश होतो. वेगवेगळ्या बँक खात्यातील बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजाची एकत्रित रक्कम 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर 10 हजार रूपयांवरील रक्कम ही 'इतर स्रोतांद्वारे मिळणारे उत्पन्न' म्हणून नोंदवणे आवश्यक आहे.

बचत खात्यातील व्याजावर टॅक्स कसा आकारला जातो?

बचत खात्यातून मिळणारे व्याज हे इतर सर्व स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाशी जोडले जाते आणि मग तुमच्या एकूण उत्पन्नावर टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. याचे प्रमाण प्रत्येक वर्षी बदलू शकते. अर्थात हे त्या कालावधीत तुमच्या बँक खात्यातून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर अवलंबून आहे.

यासाठी तुम्ही गेल्या आर्थिक वर्षातील सर्व बचत बँक खात्यांच्या स्टेटमेंटपासून सुरूवात करा. बॅंकेच्या स्टेटमेंटमध्ये प्रत्येक 3 महिन्यांनी जमा होणारे व्याज तुम्ही पाहू शकता. याची बेरीज करून एका आर्थिक वर्षात किती व्याज मिळाले, हे तुम्हाला कळू शकते.

कलम 80TTA आणि कलम 80TTB काय आहे?

इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80TTA अंतर्गत 'बचत खात्यातील ठेवींवरील व्याजाच्या संदर्भात वजावट' ही सुविधा आहे. या कलमामुळे पोस्ट ऑफिस, बँक किंवा सहकारी सोसायटीमध्ये असलेल्या बचत खात्यांच्या ठेवींवर वजावटीचा दावा करता येतो.

कलम 80TTB ही इन्कम टॅक्स कायद्यातील अशी एक तरतूद आहे; ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिक (वय 60 किंवा त्यापेक्षा अधिक) या कलमा अंतर्गत बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स सवलत मिळवू शकतात.

Section 80TTA & 80TTB