Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Joshimath Crisis: घरं वाचतील मात्र हॉटेल पडणार!

Joshimath Crisis

Image Source : www.moneycontrol.com

Joshimath Crisis: जोशीमठ येथील 2 बहुमजली हॉटेल पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तूर्तास तेथील घरांना मात्र हात लावला जाणार नाही.

Joshimath Crisis: उत्तराखंड गेल्या काही दिवसापासून एका मोठ्या समस्येला तोंड देतेयं. आपल्याला यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून जोशीमठ(Joshimath) आणि तेथे होणाऱ्या घडामोडी पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. नुकताच सरकारने जोशीमठा संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार येथील घरं सोडून  हॉटेल्स पाडण्यात येणार आहेत. चला तर या प्रकरणाबद्दल जाणून घेऊयात.

2 बहुमजली हॉटेल पाडण्याचा निर्णय

जोशीमठ हा प्राचीन भूस्खलन क्षेत्रात आणि पर्वताच्या तुटलेल्या एका तुकड्यावर, मातीच्या अस्थिर ढिगाऱ्यावर वसण्यात आलायं. त्याठिकाणची जमीन ठिसूळ असल्याने व सांडपाण्याची योग्य व्यवस्था(No Proper Sewage System) नसल्याने पाणी जमिनीत मुरतं आणि त्यामुळे त्याभागातील माती वाहून जाते, जमीन खाली धसते आणि तेच आपल्याला त्याठिकाणी बघायला मिळालं. त्यामुळे सरकारने जोशीमठ येथील 2 बहुमजली हॉटेल(Hotels) पाडण्याचा निर्णय घेतला असून तूर्तास तेथील घरांना मात्र हात लावला जाणार नाही. हॉटेल मालकांशी यासंदर्भात चर्चा केली असून त्यांनी प्रशासकीय कारवाईमध्ये सहकार्य करण्याचे ठरविले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे सचिव एम. सुंदरम(M. Sundaram) यांनी दिली.

रहिवाशांना सरकार करेल आर्थिक मदत

सद्यःस्थितीमध्ये कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही, केवळ दोनच हॉटेल तोडण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांचे सचिव एम. सुंदरम(M. Sundaram) यांनी सांगितले. मात्र लोकांनी तातडीने घरे सोडावीत म्हणून त्यांच्या घरांवर लाल निशाण देखील लावण्यात आले आहे. यासाठी सरकार त्यांना मदत करणार आहे. सरकार तेथील रहिवाशांना 1,50,000 रुपयांची मदत करणार असून सोबतच वस्तूंच्या वाहतुकीसाठी 50,000 आणि आगाऊ भरपाई म्हणून 1 लाख रुपये देणार आहे. अंतिम भरपाई नेमकी किती असेल हे नंतर निश्चित करण्यात येईल. यासंदर्भात एका आठवड्यामध्ये सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतर ही मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.