Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Joshimath: हिमालयातलं हे मंदिर का पडलं? जाणून घेण्यासाठी वाचा

Joshimath

Image Source : www.indiatoday.in

Joshimath: जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतोय. त्याची ही अवस्था होण्यामागे नेमकं कारण काय आहे, याबाबत CSIR चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलं आहे.

Joshimath: उत्तराखंडमधील एकाचवेळी शहरातल्या पाचशेहून अधिक घरांना मोठे तडे गेल्याच्या बातम्या आपण पाहत आणि ऐकत आहोत. जोशीमठ(Uttarakhand Joshimath) हा त्यातीलच एक. सध्या हा मठ एका भयानक संकटाला तोंड देतोय. जोशीमठची ही अवस्था होण्यामागे नेमकं कारण काय आहे याबाबत CSIR चे माजी महासंचालक डॉ शेखर मांडे(Dr. Shekhar Mande) यांनी एका वृत्तवाहिनीसोबत दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले आहेत ते, चला जाणून घेऊयात.

जोशीमठावर आलेल्या आपत्तीचं नेमकं कारण काय?

डॉ मांडे यांच्या म्हणण्यानुसार जोशीमठावर(Joshimath) आलेल्या आपत्तीमागे मानवी हस्तक्षेप आणि नैसर्गिक कारण(Human intervention and Natural causes) असे दोन्ही घटक जवाबदार आहेत. 1976 मध्ये मिश्रा कमिटीचा एक रिपोर्ट(Mishra Committee Report) आला होता. त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, त्याठिकाणच्या मातीची गुणवत्ता(Soil Quality) ही फार चांगली नसल्याने ते आपत्ती क्षेत्र आहे, तिथे भूस्खलन होण्याची दाट शक्यता आहे. त्याठिकाणची माती ठिसूळ असल्याने भूस्खलन होणं साहजिकच आहे. त्याचबरोबर मानवाने तिथे केलेलं बांधकाम(Anthropogenic Activities) हे देखील या परिस्थितीला जबाबदार आहे. जोशीमठ हा प्राचीन भूस्खलन क्षेत्रात आणि पर्वताच्या तुटलेल्या एका तुकड्यावर, मातीच्या अस्थिर ढिगाऱ्यावर वसण्यात आलाय. त्याठिकाणची जमीन ठिसूळ असल्याने व सांडपाण्याची योग्य व्यवस्था(No Proper Sewage System) नसल्याने पाणी जमिनीत मुरतं आणि त्यामुळे त्याभागातील माती वाहून जाते, जमीन खाली धसते आणि तेच आपल्याला तेथे बघायला मिळत आहे.

पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यास आपत्ती येईल

या ठिकाणी पर्यटनाला(Tourism) चालना देऊ नये, जर चालना दिली तर बांधकामं(Construction) वाढणार, लोकसंख्या वाढणार आणि मग अशा आपत्ती सतत येत राहणार, त्यापेक्षा प्रशासनाने पर्यटनाला प्रोत्साहन देऊ नये. तसेच जोशीमठातील(Joshimath) रहिवाश्यांसाठी पर्यायी मार्ग शोधून त्यांना होणारा त्रास कमी करता येऊ शकतो, त्यांचं विस्थापन(Relocate) करण्याची सोयही करायला हवी असे मांडे यांनी सांगितले.

अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काय करता येईल?

मांडे यांच्या म्हणण्यानुसार या  भागाची जिऑलॉजीचा(Geology) अभ्यास केला तर हिमालय(Himalaya) हा तसा नवीन पर्वत आहे. हिमालय पर्वतरांग ही भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. काही दशलक्ष वर्षांपूर्वी युरेशियन प्लेट आणि इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट या दोन टेक्टोनिक प्लेट्स धडकल्यामुळे हिमालय पर्वत रांग तयार झाली असल्याचे सांगितले जाते. हिमालयाच्या जमिनीची गुणवत्ता आणि इतर भागांमधील मातीची गुणवत्ता ही वेगळी असून त्याठिकाणची माती ही ठिसूळ आहे, हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप येत असतात आणि ते येत राहणार कारण हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. जर आपण मानवी हस्तक्षेप बंद केला, बांधकाम कमी केलं आणि इथला विकासाचा आराखडा जर नीट तज्ज्ञांकडून प्लॅन केला तर हे कमी होण्यास मदत होईल.