House Rent Hike: भारतामध्ये कोरोनानंतर महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. किरकोळ महागाई जरी आता आटोक्यात आली असली तर अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात भाववाढ झाली आहे. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे विविध प्रकारची कर्ज महाग झाली आहेत. भारतातील 7 मोठ्या शहरांमध्ये घरभाडे 23% पर्यंत वाढल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दुकांनांच्या गाळा भाड्यामध्येही मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशावर होत आहे.
हैदराबाद, दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, पुणे आणि चेन्नई या मेट्रो शहरातील घरांच्या भाड्यामध्ये (Rent hike) वाढ होत आहे. 1 हजार स्केअर फूटच्या टू बिएचके फ्लॅटसाठीचे भाडे 2019 च्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढल्याचे Anarock या मालमत्ता सल्लागार क्षेत्रातील कंपनीने म्हटले आहे. या सात शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचे भाडे वाढले आहे. नोयडामधील सेक्टर 150 मध्ये 2019 साली प्रति महिना 15 हजार 500 रुपये भाडे होते. त्यात वाढ होऊन आता भाडे 19 हजार रुपये झाले आहे. भाडे तत्त्वावर घरांची मागणी वाढल्याने दरवाढही झाल्याचे अनरॉक ग्रूपचे चेअरमन अनुज पुरी यांनी म्हटले आहे.
वर्क फ्रॉम होम संपल्याचा परिणाम (Work from home comes to end)
कोरोनाची भीती दूर झाल्यानंतर अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावत आहेत. पूर्ण वेळा किंवा हायब्रीड मोडमध्ये काम करण्यासाठी त्याच शहरात राहणे कर्मचाऱ्यांना अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे दुसऱ्या शहरात राहून कर्मचाऱ्यांना काम करता येत नाही. ज्या शहरात कंपनी आहे त्या ठिकाणी घर भाड्याने घेण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. कोरोनामुळे 2021, 2021 साली घरांची खालावलेली मागणी आता पुन्हा वाढली आहे.
पुण्यातील आयटी परिसरातील घरांची भाडेवाढ (Rent hike in IT companies' area)
अॅनरॉक संस्थेच्या आकडेवारीनुसार हैदराबादमधील हायटेक सिटी परिसरातील भाडे वाढले आहे. तसेच गच्चीबाऊली भागातील भाडेही वाढले आहे. दिल्लीजवळील नोयडा, गुरगाव, द्वारका, मुंबई परिसर, पुण्यातील हिंजवडी परिसरातील भाडेही वाढले आहे. बंगळुरुतील सर्जापूर रोड परिसरातील सदनिकांचे भाडे 14% वाढले आहे. तर शहरातील व्हाईटफिल्ड भागातील भाडे 18% वाढले आहे. पुण्यातील (Pune house rent) आयटी कंपन्या असलेल्या हिंजेवाडी भागातील घरभाडे 20% वाढले आहे. तर वाघोली भागातील भाडे 21% वाढले आहे.