Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Free Air Tickets: 'या' देशात विमानाने मोफत प्रवास करता येणार, 5 लाख मोफत विमानाची तिकीटे देण्याची घोषणा

Hong kong Airline ticket offer

Image Source : www.timesofindia.indiatimes.com

Free Air Tickets: आता तुम्ही हाँगकाँग(Hong Kong) शहरात मोफत विमान प्रवास करू शकणार आहेत. विमान तिकीट आणि व्हाउचरच्या माध्यमातून हा मोफत प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. खास ऑफरबद्दल जाणून घ्या.

Free Air Tickets: जगभरातील अनेक विमान कंपन्या त्यांच्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी विविध ऑफर देत असतात. यावेळी तुम्हाला ही ऑफर कोणत्याही एअरलाइन कंपनीकडून मिळालेली नाही तर, त्या देशाच्या पर्यटन मंडळाकडून मिळत आहे. या ऑफरमधील विशेष बाब म्हणजे यावेळी प्रवासी आणि पर्यटकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाँगकाँग पर्यटन मंडळाने 'हॅलो, हाँगकाँग(Hello, Hong Kong)' या नावाने ही ऑफर सुरू केली आहे. त्यांच्या विमान तिकीट आणि व्हाउचरच्या माध्यमातून सुमारे 5 लाख प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हाँगकाँग देशातील पर्यटकांना चालना मिळणार आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घ्या.

हाँगकाँगला भेट देण्याची मिळेल संधी

हाँगकाँग पर्यटन मंडळाने(Hong Kong Tourism Board) हाँगकाँग शहराच्या पर्यटनासाठी ही बंपर ऑफर आणली आहे. हाँगकाँगमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंडळ 5 लाख मोफत विमान तिकिटे देणार असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. हाँगकाँग टुरिझम बोर्डाचे कार्यकारी संचालक डॅन चेंग(Dan Cheng) म्हणतात की, एअरलाइन्सला पाठिंबा देण्यासाठी मोफत तिकिटे खरेदी करण्यात आली होती. आता कोरोनाची साथ हळूहळू संपत आहे.

हॅलो, हाँगकाँग! स्वागत करण्यास आम्ही तयार आहोत!

हाँगकाँग पर्यटन मंडळाने अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हॅलो, हाँगकाँग(Hello, Hong Kong)! आम्ही तुमचे परत स्वागत करण्यास तयार आहोत. हारून क्वोक आणि सॅमी चेंग सारख्या हाँगकाँग स्टार्ससह शहरांना एक्स्प्लोअर करा. हाँगकाँग तुम्हाला 5,00,000 मोफत विमान तिकिटे आणि व्हाउचर देत आहे. भेट द्या आणि आनंद लूटा.

कोरोनानंतर पर्यटनाला चालना

कोरोना महामारीमुळे हाँगकाँग बरेच दिवस बंद होते. बऱ्याच काळापासून कोणीही व्यक्ती हाँगकाँगला गेलेली नाही. तसेच अलिकडचं  काही महिन्यांपूर्वी  कोविड प्रवास निर्बंध आता मागे घेण्यात आले आहेत. आता शहराला त्याच्या पर्यटन उद्योगाद्वारे सावरण्याची आशा आहे.

असे तिकीट बुक करा

एयरपोर्ट अथॉरिटी(Airport Authority) हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रेड लॅम टिन-फूक (CEO Fred Lam Tin-fook) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोफत तिकिटे हाँगकाँगस्थित एअरलाइन्स कॅथे पॅसिफिक(Cathay Pacific), एचके एक्सप्रेस(HK Express) आणि हाँगकाँग एअरलाइन्सद्वारे (Hong Kong Airlines) वितरित केली जातील. आपण त्याच्या वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता.