Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Demand: गृहकर्जे महागली तरीही मागणी कायम, कर्जदारांवर व्याजदर वाढीचा परिणाम नाही

Home Loan

Home Loan Demand: रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी कर्जांचे दर वाढवले आहेत. गृह कर्जाचा दर 10% नजीक पोहोचला असला तरी कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. गृह कर्जाच्या मागणीवर व्याजदर वाढीचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे.

मागील 10 महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढीचा सपाटा लावला आहे. मे 2022 पासून जाहीर झालेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 2.50% ने वाढला आहे. याचे प्रतिबिंब बँकांच्या कर्जदरांवर देखील उमटले. पतधोरणातील व्याजदर वाढीचा भार बँकांनी ग्राहकांवर टाकला. बँकांनी सर्वच प्रकारच्या कर्जांचे व्याजदर वाढवले. यामुळे गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज अशी सर्वच प्रकारची कर्जे महागली. मात्र  गृह कर्जाच्या मागणीवर व्याजदर वाढीचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे.

कर्ज घेऊन घर खरेदीला ग्राहक प्राधान्य देत आहेत. 30 ते 50 लाख आणि 50 ते 75 लाख रुपयांच्या गृह कर्जांची मागणी कायम असल्याचे एका संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेपाठोपाठ बँकांनी व्याजदर वाढवले होते. यामुळे विद्यमान कर्जदारांचा मासिक कर्जांचा हप्ता (EMI) किमान 10 ते 25% इतका वाढला आहे. विद्यमान कर्जदारांना वाढीव ‘ईएमआय’साठी जादा पैशांची तजवीज करताना पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. मात्र नव्याने कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. घर खरेदीसाठी कर्जाची मागणी पूर्वीप्रमाणेच आहे.रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी कर्जांचे दर वाढवले आहेत. गृह कर्जाचा दर 10% नजीक पोहोचला असला तरी कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.  

रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असलेल्या इंडिया मॉर्टगेज गॅरंटी कॉर्पोरेशन (India Mortgage Guarantee Corporation-IMGC)च्या अभ्यासानुसार 30 ते 50 लाख आणि 50 ते 75 लाख रुपयांच्या गृह कर्जाला मागणी आहे. या श्रेणीत बड्या बँकांबरोबच बिगर बँकिंग वित्त संस्थांकडून कर्ज दिली जातात. ग्राहकांना अनेक ऑफर्स या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. आयएमजीसीअंतर्गत एसबीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी, एलआयसी हौसिंग फाययान्स, आयसीआयआयसीआय बँक आणि हौसिंग फायनान्स कंपन्यांचा समावेश आहे. 'आयएमजीसी'कडून गृह कर्जांवर विमा सुरक्षा दिली जाते. जेव्हा कर्जाचा हप्ता फेडला जात नाही किंवा कर्जदार कर्जफेड बुडवतो तेव्हा बँकांना कर्जाची भरपाई विम्यामधून केली जाते.

रिझर्व्ह बँकेने सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केली. यामुळे रेपो दर 2.50% वाढला. याचा कर्जदारांवर आणि गृह कर्जाच्या मागणीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास 'आयएमजीसी'ने केला. तरुणाईकडून भाडेतत्वावर घर घ्यावे कि खरेदी करावे याचाही अभ्यास करण्यात आल्याचे आयएमजीसीचे मुख्य वितरक अधिकारी अमित दिवाण यांनी सांगितले. ते म्हणाले की मागील 10 महिन्यात क कर्जाचा व्याजदर वाढत आहे. यामुळे कर्जाचा व्याजदर 9 ते 10%  या दरम्यान गेला आहे. 'ईएमआय'च्या खर्चात सरासरी 10 ते 25% वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थिती कर्जदारांना बँकेशी किमान व्याजदरासाठी तडजोड करायला हवी.

गृह कर्ज महागली असली तरी 30 ते 50 लाखांमधील गृह कर्जाची मागणी वाढली आहे. या श्रेणीत अनेक बँकांकडून आणि एनबीएफसींकडून कर्ज देण्यात येत आहे. शहरांमधील प्रॉपर्टींच्या किंमती या दरम्यान असल्याने या कर्जांना मागणी असल्याचे दिवाण यांनी सांगितले. मागील पाच वर्षांचा विचार केला तर कर्जदारांचे सरासरी वय 38 ते 39 या दरम्यान आहे. मात्र मिलेनिअल्स प्रॉपर्टी खरेदी करण्याचे प्लॅन पुढे ढकलत आहेत. त्याऐवजी प्रॉपर्टी भाड्याने घेऊन राहण्याकडे तरुणाईचा कल असल्याचे दिवाण यांनी सांगितले.

एनपीए किंचिंत वाढला 

मागील तिमाहीत बँकांमधील बुडीत कर्जांचे प्रमाण (एनपीए) किंचित वाढल्याचे 'आयएमजीसी'ने म्हटले आहे. कर्जाचा दर वाढल्यानंतर ईएमआय वाढला आहे. याचा आर्थिक भार कर्जदारांवर पडला आहे. त्यातच मंदीच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी नोकर कपातीचा सपाटा लावला आहे. एनपीएतील वाढ रोखण्यासाठी बँकांनी कर्जदारांना मुदत वाढवून देण्यासारखा पर्याय आयएमजीसीने म्हटले आहे. एनपीए वाढल्यास बँकांना रिकव्हरी करणे अवघड जाण्याची शक्यता आहे.