Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Emergency Fund: नवीन घर घेणाऱ्यांसाठी Emergency Fund फायद्याचा ठरू शकतो?

Emergency Fund for Home Buyers

Home Emergency Fund: स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. पण प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. पण त्याचे योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केले तर ते अवघड ही नाही. चला तर जाणून घेऊ, इमर्जन्सी फंडाचा नवीन घर घेण्यासाठी कसा वापर होऊ शकतो.

Emergency Fund for New Homeowners: इमर्जन्सी फंड हा प्रत्येकालाच गरजेचा असतो. एका विशिष्ट कारणासाठी इमर्जन्सी फंडचा उपयोग होतो असे नाही. आर्थिक अडचणीच्या काळात उपयोगी पडणारा फंड म्हणजे इमर्जन्सी फंड (आपत्कालीन निधी). पण सध्याची परिस्थिती पाहता भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपत्कालीन निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. आज आपण नवीन घर घेताना आपत्कालीन फंड (Emergency Fund) कशाप्रकारे फायद्याचा ठरू शकतो, हे समजून घेणार आहोत.

स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. पण प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. अर्थातच याचे कारण पैसा. आपल्याकडे पुरेसे पैसे असतील तरच हे स्वप्न सत्यात उतरू शकतं. अनेक जण वर्षानुवर्षे स्वत:च्या मालकीचे घर असावे हे स्वप्न उराशी बाळगून असतात. पण ते पूर्ण कधी होईल याचे उत्तर त्यांच्याकडे नसते.

घर खरेदी करताना प्लॅनिंग हवे!

घर खरेदी करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. पण योग्य नियोजनानुसार ठरवले तर ती तितकीशी अवघड सुद्धा नाही. घर घेणं यामागे रितसर प्लॅनिंग असणे गरजेचे आहे. बाजारातून भाजी आणण्या इतके घर विकत घेणे सोपे नाही. बँकेकडून गृह कर्ज (Home Loan) मिळत असले तरी काही रक्कम आपल्याकडे असणे गरजेचे आहे. घराच्या एकूण किमतीपैकी अंदाजे 80 टक्क्यांपर्यंतची रक्कम बँका कर्ज म्हणून देतात. उर्वरित 20 टक्के रक्कम ही आपल्याला जमाच करावी लागते. त्याला डाऊन पेमेंट (Down Payment) म्हणतात. त्यानंतर घराचे रजिस्ट्रेशन, नोंदणी फी यासाठी सुद्धा मोठी रक्कम हाताशी असणे आवश्यक असते.

कर्जाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम कशी मिळवणार?

घरासाठी कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेव्यतिरिक्त डाऊन पेमेंट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनसाठी लागणारे पैसे तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंडमधून वापरू शकता. म्हणजे इमर्जन्सी फंड उभा करताना त्याच्या उद्दिष्टामध्ये घरासाठी डाऊन पेमेंट, रजिस्ट्रेशन फी, स्टॅम्प ड्युटी फी आणि भविष्यातील किमान 3 ते 4 महिन्यांचे होम लोनचे ईएमआय भरता येतील याचा विचार केला तर तुम्हाला त्याची मोठी मदत होऊ शकते.

इमर्जन्सी फंडामध्ये आपल्या संकटांचा समावेश करा

इमर्जन्सी फंड हा अचानक येणाऱ्या संकटात वापरण्यासाठीच असतो. यामध्ये बहुतांश संकटे ही आजारपणाची आणि नोकरी जाण्यचीच असतात. पण त्याव्यतिरिक्त आपण आपल्या इमर्जन्सी फंडामध्ये संकटांची वेगळी यादी केली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी तरतूदसुद्धा करता येऊ शकते. त्यामुळे इमर्जन्सी फंडचा उपयोग नवीन घराच्या डाऊन पेमेंटसाठी किंवा स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनचा खर्च उभारण्यासाठी नक्कीच करू शकतो. पण त्याची सुरूवात तुम्हाला खूप अगोदरपासून करणे गरजेचे आहे.

इमर्जन्सी फंडचा योग्य वापर 

इमर्जन्सी फंडचा वापर आपण कशासाठी करतो. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. साठवून ठेवलेले पैसे मौजमजेसाठी वापरले तर त्या साठवलेल्या फंडाला काहीच अर्थ नाही. समजा, तुमचे स्वत:चे घर आहे. त्यासाठी तुम्ही होम लोन काढले आहे. आता तर तुम्हाला डाऊन पेमेंट आणि स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन भरण्याचे टेन्शन सुद्धा नाही. तरीही तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये घराच्या 2 ते 3 महिन्यांच्या ईएमआयचे पैसे भरता येतील. एवढी रक्कम असणे गरजेचे आहे. या रकमेतून तुम्ही तुमचे लोन लवकर फेडू शकता. पैसे नुसते साठवूण काहीच उपयोग नसतो. साठवलेले पैसे तुम्ही जर होम रिपेमेंटसाठी वापरले तर तुमचा ईएमआय आणि कर्जाची वर्षे कमी होतील आणि तुम्ही होम लोनच्या जाळ्यातून लवकर सुटाल.

अशाप्रकारे तुम्ही कल्पकतेने तुमच्या इमर्जन्सी फंडाचा वापर करू शकता आणि अजूनपर्यंत तुम्ही जर इमर्जन्सी फंड (Emergency Fund) तयार केला नसेल तर लगेच तयार करा.