• 26 Mar, 2023 15:44

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपचे कोणते शेअर्स सर्वात जास्त घसरले?

Adani Group

Image Source : www.bloomberg.com

Hindenburg effect हा अदानी समूहाच्या शेअर्सवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शुक्रवारी बाजार संपताना कुठला शेअर सर्वात जास्त घसरला हे इथे बघणार आहोत.

गेल्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये नऊ लाख कोटींची घट झाली आहे. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाची एकूण मार्केट कॅप 19.2 लाख कोटी होती.  त्यानंतर 3 फेब्रुवारीच्या व्यवसाय सत्रानंतर ती 10 लाख कोटींवर आली आहे.  दलाल स्ट्रीटवर अदानी समूहाच्या 10 कंपन्या सूचीबद्ध आहेत. या कंपन्या अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मार, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, अंबुजा सिमेंट्स, एसीसी आणि एनडीटीव्ही आहेत. हिंडेनबर्ग अहवाल सार्वजनिक झाल्यापासून या कंपन्यांचे शेअर्स जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत.

अदानी टोटल गॅसचे शेअर्स सर्वाधिक घसरले

गेल्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये अदानी टोटल गॅसच्या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. कंपनीचे शेअर्स 3885.45 रुपयांवरून 51% घसरून 1901.65 रुपयांवर आले. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये 40% ची घसरण झाली आहे. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 38% पर्यंत घसरले आहेत. अदानी ट्रान्समिशन 37% पर्यंत घसरले आहेत.  अदानी पोर्ट्स आणि SEZ च्या शेअर्समध्ये 35% ची घसरण झाली आहे. अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये 33% ची घसरण झाली आहे. अदानी विल्मरचे शेअर्स 23% पर्यंत घसरले आहेत. अदानी पॉवर, ACC आणि NDTV चे शेअर्स अनुक्रमे 22.5%, 21% आणि 17% पर्यंत घसरले आहेत.

शुक्रवारी म्हणजे 3 फेब्रुवारीला  आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 35% इतके  घसरले. S&P डाऊ जोन्सने अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 7 फेब्रुवारीपासून निर्देशांकातून काढून टाकले जातील असे सांगितल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या भावात घट झाली. बीएसईवरील कंपनीचे समभाग शेवटी एक टक्क्यांच्या वाढीसह बंद करण्यात यश आले होते.

S&P Dow Jones ने गुरुवारी माहिती दिली की, अदानी ग्रुपच्या संदर्भात चालू असलेल्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनंतर शेअर्समधील सतत अस्थिरता लक्षात घेऊन निर्देशांकाने समूहाचे शेअर्स त्याच्या स्थिरता निर्देशांकातून काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. 7 फेब्रुवारीपासून हा निर्णय घेतला जाणार आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सवर सतत प्रेशर आहे.

अदानी समूहाच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि फसवणूक झाल्याचा दावा करणारा हिंडेनबर्गचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये उलथापालथ  सुरू आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अदानी समूहाचे समभाग मूलभूत आधारावर 85 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. याचे कारण कंपनीचे गगनाला भिडणारे मूल्यांकन आहे. या अहवालात अदानी समूहावर गेल्या अनेक दशकांमध्ये खात्यांमध्ये फेरफार, स्टॉकमध्ये हेराफेरी आणि मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत.