Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero touring bike बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Hero touring bike

Image Source : www.bikedekho.com

Hero touring bike बाजारात दाखल झाली आहे. ही बाइक आकर्षक करण्यासाठी यात अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. कोणत्या आहेत या सुविधा आणि काय आहे या बाईकची किमत ते जाणून घेऊया.

भारतातील प्रमुख दूचाकी (Two wheeler) वाहने तयार करणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पकडून 200 सीसी सेगमेंटची  टूर बाईक लॉंच करण्यात आली आहे. या बाइकची किमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया. 

नवीन Hero Xpulse 200T 4Vमध्ये कंपनीने 200 सीसीचे चार वॉल्व ऑइल कूल्ड इंजिन दिले गेले आहे. ज्यामुळे बाईकला 19.1 पीएस आणि 17.3 न्यूटन मीटरची ताकद मिळू शकते. बाइकमध्ये टॉर्क देण्याचा हेतू आरामदायक टूर बाइकचा अनुभव देणे हा आहे. इंजिनला पाच स्पीड गियरबॉक्सशी जोडले गेले आहे. बाईकला या तऱ्हेने डिझाईन केले आहे की, ज्यामध्ये वेगात असतानाही कोणत्याही त्रासाशिवाय चालवली जाता यावी. यासाठी बाईकच्या गियर रेशोला सुद्धा अपडेट केले गेले आहे. 

बाईकच्या डिझाईनला देखील अपडेट केले गेले आहे. बाईकमध्ये फूल एलइडी हेडलॅम्प दिले गेले आहेत ज्याच्याबरोबर क्रोमचाही उपयोग केला आहे. याच्या बरोबरच बाईकमध्ये कलर्ड वायजर, फ्रंट फोर्क स्लीव्स आणि कलर्ड सिलेंडर हेड सुद्धा दिला गेला आहे. लांबच्या प्रवासतही थकावट होऊ नये, अशा तऱ्हेने बाईकच्या सीटचे डिझाईन केले आहे. 

बाईकमध्ये नवे कलरही समाविष्ट करण्यात आले आहेत. ज्यामुळे याचे डिझाईन आकर्षक झाले आहे. हीरो एक्स पल्स 200 टी मध्ये स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शीट गोल्ड कलर्सचा पर्यायही मिळेल. 

टुर बाइक असल्यामुळे कंपनीने याच्या टेक्निकवरही लक्ष दिले आहे. लांबच्या प्रवासावेळी रायडरला त्रास होऊ नये यासाठी कंपनीने बाइकमध्ये फूल डिजिटल एलसीडी क्लसटर दिला आहे. याच्याबरोबर स्मार्टफोन कनेकटीविटीही दिली आहे. या फीचरमुळे स्मार्टफोन कनेक्ट केल्यावर कॉल अलर्ट, नेविगेशनची सुविधा मिळेल. अंडरसीट चार्जरद्वारे फोन चार्ज केला जाऊ शकतो. गियर इंडिकेटर आणि साइड स्टँड इंजिन कट ऑफलाही बाईकमध्ये जोडले गेले आहे.  
एवढ्या सुविधा असणाऱ्या बाईकची किमत काय आहे ते जाणून घेऊया. मुंबईमध्ये याची शोरूम किमत 1 लाख 25 हजार 726 रुपये आहे. याच्या आधीची एक्स पल्स 200 टी ची एक्स शोरूम किमत 1 लाख 24 हजार इतकी होती.