शुक्रवारी देशांतर्गत बाजार खुला झाल्यावर सेन्सेक्समध्ये घसरण बघायला मिळाली आहे. आठवडयाच्या पाचव्या दिवशी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये मोठी घसरण झाली असून HDFC bank shares मध्ये देखील याचा परिणाम बघायला मिळाला आहे.
सकाळी बाजार उघडल्यानंतर सुरुवातीच्या काही तासात HDFC bank शेअर्समध्ये 2.53 टक्क्यांची घट झालेली दिसून आली. यावेळी सेन्सेक्समध्ये झालेली घसरण 1.5 टक्क्यांच्या आसपास होती. एकूणच आज विक्रीचा जोर बाजारात दिसत होता. यामुळे एकूणच सेन्सेक्सवर परिणाम झाला होता. मात्र HDFC bank, HDFC या शेअर्समध्ये सुरुवातीच्या ट्रेडमध्ये अडीच टक्क्यापेक्षाही अधिक घट दिसून येत होती.
जागतिक पातळीवरही नकारात्मक चित्र होते. याचा देशांतर्गत बाजारावरही परिणाम झालेला बघायला मिळाला. यातून देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीसह ट्रेड सुरु होते.यानंतर बाजारात मोठी विक्री झालेली बघायला मिळाली. सुरुवातीच्या कालावधीत सेन्सेक्सने 900 अंकापेक्षाही अधिकची घसरण नोंदवली होती. त्याचवेळी निफ्टीमध्येही घट होत तो 17400 अंकावर पोहोचला होता. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत असून सध्या सेन्सेक्स 775 अंकांच्या घसरणीसह 59030 अंकावर ट्रेड करत आहे. अद्यापपर्यंत यात 1.28 टक्क्यांची घट झालेली बघायला मिळाली आहे. दुसरीकडे, निफ्टी निर्देशांकातही 250 पेक्षा अधिक अंकांची घसरण झालेली बघायला मिळाली आहे.
HDFC Bank Shares मध्ये महिनाभरातही मोठी घट
शेअर बाजार क्लोज होण्यापूर्वी अर्धा तास आधी HDFC bank शेअर्स 1585 रुपयांवर ट्रेड करत होता. अद्यापर्यंत 2.78 टक्क्यांची घट झालेली बघायला मिळत आहे. आठवडाभरापूर्वीच्या तुलनेत 0.57 टक्क्यांनी हा शेअर्स घसरला आहे. महिनाभरापूर्वी 1655 रुपयांवर हा शेअर्स ट्रेड करत होता. महिनाभरात यात 4.07 टक्क्यांची घट झालेली बघायला मिळत आहे. Groww App वर याविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
अदानी एन्टरप्रायझेसचे समभाग 5 टक्क्यांनी घसरले होते
अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात देखील मोठी घसरण बघायला मिळाली. या कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या तासात जवळपास 5 टक्क्यांनी घसरलेले बघायला मिळाले. यानंतर शेअर्सचा भाव वधारतानाही दिसत होता. शेअर बाजार क्लोज व्हायला सुमारे अर्धा तास बाकी असताना या शेअर्समध्ये 2.89 टक्के इतकी घसरण झाली होती. शेअर्सच्या भावात 50 रुपयांची घसरण होऊन 1902 वर ट्रेड करताना दिसत होता. गेल्या आठवडाभरात या शेअर्समध्ये 12.50 टक्क्यांची घसरण झाली आहे. हिंडनबर्गने अहवाल जाहीर केल्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्वच कंपन्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.