आज महाराष्ट्रातील सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी ₹ 5225 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटसाठी ₹ 5225 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्या-चांदीची किंमती कालच्या तुलनेत आज वाढलेल्या दिसत आहेत. 24 कॅरेट सोन्यासाठी अनेकजण पसंती दर्शवतात. या प्रकारात 99.95% सोन्याची शुद्धता असल्या कारणाने हे सोने खरेदी करण्याकडे लोकांचा कल अधिक असतो. आज रोजी 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम दर ₹5874 इतका आहे. काल 24 कॅरेट सोन्याचा दर ₹5863 इतका नोंदवला गेला होता.
तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याच्या भावातही भाववाढ पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्यात 91.67% सोने शुद्धता असते. आज रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर ₹5384 इतके आहे. काल हे दर ₹5375 इतके नोंदवले गेले होते. 21 जानेवारी रोजी सोन्याचे भाव काही प्रमाणात कमी झाले होते. परंतु गेले दोन दिवसांत सोन्या-चांदीची भाववाढ सुरूच आहे.
सोने खरेदीसह चांदी खरेदी देखील अनेक लोक करत असतात. आज रोजी चांदीचे भाव प्रति किलो ₹72300 इतका नोंदवला गेला आहे. म्हणजेच 1 ग्राम चांदीसाठी ग्राहकांना ₹72.3 रुपये मोजावे लागणार आहेत. 19 जानेवारी रोजी चांदीच्या किंमतीत घट पाहायला मिळाली होती. परंतु त्यानंतर चांदीची भाववाढ अजूनही तेजीत असल्याचे पाहायला मिळते आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
तुम्ही खरेदी केलेले किंवा खरेदी करू इच्छिणाऱ्या सोन्याची शुद्धता जर तुम्हांला तपासायची असेल तर एकदम सोपी पद्धत आहे.सोन्याची शुद्धता पडताळणीसाठी सरकारने एक ऍप बनवलं आहे. 'BIS Care App' हे या ऍपचे नाव आहे.याद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या ऍपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता. या ऍपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या ऍपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.