Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुम्ही 2022 मध्ये नोकरी बदलली आहे का? मग टॅक्स रिटर्न कसे भरायचे जाणून घ्या!

तुम्ही 2022 मध्ये नोकरी बदलली आहे का? मग टॅक्स रिटर्न कसे भरायचे जाणून घ्या!

वैयक्तिक करदात्यांनी 31 जुलैपर्यंत ITR दाखल करणे आवश्यक आहे; त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू करा. शेवटच्या क्षणी धावपळ करण्याची गरज नाही.

आर्थिक वर्ष 2021-22 मधील इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल करण्याची डेडलाईन (शेवटची तारीख) जवळ आली आहे. वैयक्तिक करदात्यांना 31 जुलै पर्यंत आयटीआर  रिटर्न फाईल (ITR Return File) करणं आवश्यक आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली पाहिजे. यामुळे शेवटच्या क्षणी तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही. जर तुम्ही मागील आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर तुम्हाला आयटीआर कसे फाईल करायचे हे जाणून घेणं गरजेचं आहे.

सर्व कंपनीच्या आपल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 (Form 16) देते. प्रत्येक वर्षी 15 जून पर्यंत कंपन्यांनी फॉर्म 16 जारी करणं आवश्यक आहे. फॉर्म 16 मध्ये कंपनीकडून मिळणाऱ्या पगाराची इत्यंभूत माहिती असते. यात कंपनीने तुमच्या पगारावर किती टीडीएस (Tax Deduction again Source-TDS) कापला आहे, याची माहिती सुद्धा असते. त्याचबरोबर या फॉर्ममध्ये तुमचा घरभाडे भत्ता (HRA), नियमित वजावट (Standard Deduction) आणि 80C अंतर्गत मिळालेल्या वजावटीची सविस्तर माहिती दिलेली असते.


जुन्या आणि नवीन दोन्ही कंपनीकडून फॉर्म 16 मागा

सर्वप्रथम तुम्हाला जुनी आणि नवीन अशा दोन्ही कंपनीकडून फॉर्म 16 मागून घ्यावा लागेल. नवीन कंपनी स्वत:हून तुम्हाला फॉर्म 16 देईल. पण जुन्या कंपनीच्या व्यवस्थापनाकडे अर्ज करून तुम्हाला फॉर्म 16 मागून घ्यावा लागेल. यासाठी तुम्ही लगेच मेलद्वारे कंपनीच्या एचआर विनंती अर्ज करा. नवीन आणि जुन्या दोन्ही कंपन्यांचे फॉर्म 16 मिळाळ्यावर सर्वप्रथम त्यातील माहिती चेक करून घ्या.

दोन्ही फॉर्म 16 मधील उत्पन्न एकत्रित करा

फॉर्म 16 च्या बी भागामध्ये (Form 16 Part - B) एकूण पगाराचे ब्रेक-अप दिलेले असते. तुमच्याकडून वजावटीसाठी दाखल करण्यात आलेली गुंतवणूक आणि टॅक्सच्या स्लॅबमध्ये न बसणारे भत्ते अशी सर्व माहिती यात दिलेली असते. तुम्हाला दोन्ही कंपन्यांकडून मिळालेला एकूण पगार एकत्रित करावा लागेल. तसेच दोन्ही फॉर्म 16 मधील एचआरए (HRA), एलटीए (LTA) यांची रक्कम एकत्रित करावी लागेल. यातून तुम्हाला अशी एक रक्कम मिळेल. ज्यावर तुम्ही टॅक्स सवलतीचा दावा करू शकता.

नियमित वजावट 50 हजार रूपये

नोकरी करणाऱ्यांना एका आर्थिक वर्षात 50 हजार रूपयांपर्यंत नियमित वजावट (Standard Deduction) मिळते. त्यानुसार तुमच्या दोन्ही फॉर्म 16 मध्ये प्रत्येकी 50 हजार रूपयांची वजावट दिली जाऊ शकते. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला फक्त एकदाच 50 हजार रूपयांचा क्लेम करता येईल. त्यानंतर तुम्ही 80C, 80D या अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीचा क्लेम करू शकता. एकूण टॅक्सेबल उत्पन्नात पगार, बॅंकेतून मिळणारे व्याज, शेअर्समधून मिळणारा डिव्हिडंट यांचा समावेश असतो. पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की, जर तुम्ही जुनी टॅक्स स्लॅब निवडली असेल तर तरच क्लेम करू शकता.

एकूण टॅक्सेबल उत्पन्न एकत्रित केल्यानंतर त्यातून तुम्हाला टॅक्स लायबिलिटी काढावी लागणार. त्यातून सर्व टॅक्स वजा करा. हा टॅक्स अगोदरच कापून तुमच्या पॅनकार्ड क्रमांकामध्ये डिपॉझिट केलेला असतो. जो तुम्हाला टीडीएसच्या नावाखाली फॉर्म 16 ए भागामध्ये पाहता येतो.

जर एखाद्याला कंपनीकडून फॉर्म 16 मिळाला नसेल तर, तरीही तो कर्मचाही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (Income Tax File Return) करू शकतो. यासाठी त्याला पगाराच्या स्लिप लागेल. पगाराच्या सिल्पद्वारे एकूण टॅक्सेबल उत्पन्न काढता येऊ शकते. त्यात गुंतवणुकीच्या योजनांची रक्कम जोडा आणि तुमचा आयटीआर फाईल रिटर्न करा. अशाप्रकारे तुम्ही सहज रिटर्न फाईल करू शकता.