• 07 Dec, 2022 08:09

Market Scam : Harshad Mehta Scam Explained; शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळेबाज!

Market Scam : Harshad Mehta Scam 1992

Harshad Mehta Scam Amount : हर्षद मेहता यांनी केलेला घोटाळा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा म्हणजे सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा स्कॅम होता. मेहता यांच्या या स्कॅमला सिस्टिमॅटिक स्कॅम (Systematic Scam) असे म्हटले जाते.

Harshad Mehta Scam 1992 : ‘There is always a Loophole. You just have to find it’, प्रत्येक गोष्टीत एक लूपहोल असतोच आपण, फक्त तो शोधायचा असतो. कुठेतरी ऐकलेलं हे वाक्यं प्रत्येक गोष्टीत लागू होताना दिसतंय. प्रत्येक प्रश्नात उत्तरापर्यंत जाणारा एक चांगला मार्ग आणि एक चुकीचा मार्ग असतोच. या मार्गाच्या मध्येच कुठेतरी असतो हा लूपहोल. लूपहोल वाईट नाही; त्याचा वापर ज्याप्रकारे होतो. ते वाईट असू शकते आणि आतापर्यंतच्या इतिहासात ज्यांना हे लूपहोल सापडलेत त्यांनी त्याचा गैरवापरच केलाय. प्रत्येक गोष्टींमध्ये जसे लूपहोल्स असतात; तसेच ते आपल्या शेअर मार्केटमध्येही आहेत आणि हे सिद्ध केले हर्षद मेहता (Harshad Mehta) यांनी. उत्तम अशा या ट्रेडरला आज आपण एक स्कॅमर (Scamer) म्हणून ओळखतो. हर्षद मेहता यांनी भरपूर मोठा घोटाळा तर केलाच; पण मार्केटमधील लूपहोल कोणते आहेत आणि त्याचा एखादा व्यक्ती किती गैरवापर (Harshad Mehta Scam) करू शकतो हे सुद्धा दाखवून दिले.

भारतीय शेअर मार्केटमध्ये अनेक घोटाळे झाले, आताही होत असतील किंवा पुढेही होत राहतील. पण हर्षद मेहता यांचा 1992चा हा घोटाळा (Harshad Mehta Scam 1992) मार्केटच नाय तर संपूर्ण भारताच्या चांगला लक्षात राहिलाय. आजच्या या मार्केट स्कॅम (Market Scam) या सेगमेंटमध्ये आपण जाणून घेणार आहोत; हर्षद मेहता यांच्या 1992च्या घोटाळ्याबद्दल आणि जाणून घेणार आहोत काय होते हे लूपहोल्स ज्यांनी मार्केट बुडवून टाकलं होतं.

घोटाळ्यांची साखळी!

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा असलेला हा स्कॅम 5 हजार कोटी रुपयांचा (Harshad Mehta Scam Amount) होता. हर्षद मेहता यांच्या या स्कॅमला एक सिस्टिमॅटिक स्कॅम (Systematic Scam) असे म्हटले जाते. त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (Bombay Stock Exchange-BSE) शेअर्स खरेदी करण्यासाठी बँकिंग सिस्टिममधून 1 बिलियनहून अधिक रुपयांची अफरातफर केली होती. त्यांच्या या स्ट्रॅटेजीमुळे स्टॉक एक्सचेंजची सुरक्षा व्यवस्था कोलमडली आणि संपूर्ण एक्सचेंज सिस्टीमवर याचा परिणाम झाला. गुंतवणूकदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घोटाळ्याची व्याप्ती इतकी मोठी होती की, भारताच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या एकत्रित बजेटपेक्षा याचे मूल्य जास्त होते. या सिस्टेमॅटिक स्कॅमच्या 3 पद्धती होत्या; ज्या एकत्रितपणे तुटल्या. परिणामी संपूर्ण मार्केटला त्याचा फटका बसला. (Harshad Mehta Scam Explained)

स्टॅम्प पेपर स्कॅम (Stamp Paper Scam)

90 च्या दशकात बँकांना इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास मनाई होती. बॅंकाकडून त्यांचा प्रॉफिट सर्वांसमोर मांडणे व त्यांच्या असेटमधील काही भाग सरकारच्या फिक्स्ड इंटरेस्ट बॉण्ड्समध्ये (Fixed Interest Bonds) गुंतवणूक करणे, हे अपेक्षित होते. बँकांकडून असलेल्या याच अपेक्षेतून हर्षद मेहता यांनी बँकांना अमिश दाखवून त्यांच्याकडून पैसे काढून हे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकण्यास सुरूवात केली होती. बँकांना उच्च व्याजदराचे अमिश दाखवून त्यांचे पैसे ते स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करवून घेत असत.

Harshad mehta Memes  (1)

बँक रिसिप्ट स्कॅम (Bank Receipt Scam)

या स्कॅममधील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक रिसिप्ट (Bank Receipt) आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेडी फॉरवर्ड डील (Read Forward Deal). रेडी फॉरवर्ड डील म्हणजे अशा फंडिंगची डील, जी मिळवण्यासाठी सिक्युरिटीजची खरेदी विक्री केली जाते. हया सिक्युरिटीजच्या खरेदी-विक्रीमध्ये खऱ्या सिक्युरिटीज हलवल्या जात नाहीत. त्याऐवजी सिक्युरिटी विकणारी बँक सिक्युरिटी खरेदी करणाऱ्या बँकेला बँक रिसिट देतात. विकणाऱ्या बँकेकडून रिसिट स्वरूपात ही बँक रिसिट दिली जाते. ही बँक रिसिट विकत घेणाऱ्या बँकेला पैशांच्या बदल्यात सिक्युरिटी देण्याची हमी देते. 

बँकेचे हे रिसिटचे गणित मेहतांना समजल्यानंतर तेही यात उतरले. त्यांना अशा बँकांची गरज होती. ज्या खोट्या बँक रिसिट तयार करतील किंवा अशा रिसिट तयार करतील ज्यांना गव्हर्मेंट सिक्युरिटीजचा पाठिंबा नसेल. अशा रिसिट जशा त्यांना मिळाल्या तसे ते या रिसिट इतर बँकांना देऊ लागले व त्याबदल्यात मेहतांना बँकांकडून पैसे मिळू लागले. हे पैसे ते त्यांच्या अकॉउंटमध्ये घेऊन स्टॉक्समध्ये गुंतवत असत. शेअर मार्केटमधून मोठा फायदा मिळाला की त्यातून बँकेचे जेवढे पैसे होते तेवढे ते त्यांना देऊन स्टॉक्समधून मिळालेला फायदा ते स्वत:कडे ठेवत. 

रेडी फॉरवर्ड डील स्कॅम (Ready Forward Deal Scam)

त्यावेळच्या सरकारी नियमानुसार बँकांना सिक्युरिटीजची खरेदी विक्री करण्यासाठी ब्रोकर्सद्वारे व्यवहार करणे बंधनकारक होते. जेव्हा एखाद्या बँकेला सिक्युरिटी विकायची असायची तेव्हा ब्रोकर इतर बँकांकडे जाऊन ती सिक्युरिटी विकायचे. त्यावेळी खरेदीसाठी हीच प्रक्रिया अवलंबवली जात होती. या प्रक्रियेतील एकूण एक खाचखळगे ब्रोकर्सना समजताच ते स्वत: बँक ब्रोकर बनले आणि जे चेक बँकेच्या नावावर त्यांनी घ्यायला हवे होते. ते चेक स्वतःच्या नावावर घेऊ लागले. त्यामुळे मिळणारे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होत होते. जेव्हा बँक सिक्युरिटीचे पैसे मागत असत. तेव्हा ते दुसऱ्या बँकेकडे जाऊन स्वतःच्या नावाचे चेक घेऊन पुन्हा हाच डाव खेळायचे. त्यामुळे त्यांच्या अकॉउंटमधले पैसे ते असेच शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे. याच डीलचा उपयोग त्यांनी इंडियन फायनान्शिअल सिस्टिमच्या बँक रिसिट सिस्टिममध्ये देखील केला आहे. ही सिस्टिम इतकी खराब होती की, 1992 च्या स्कॅमनंतर जानकीरामन समितीला (Janakiraman Committee) ही संपूर्ण सिस्टिम बदलावी लागली. 

हर्षद मेहता लहान बँकांकडून बँक रिसिट मागून घेत असत. या बँका लहान असल्यामुळे मेहता त्यांचे पैसे स्वतःच्या मर्जीनुसार ठेवत होते, व त्याचा संपूर्ण वापर शेअर मार्केटमध्ये छोट्या कंपन्यांना मोठं करून त्यातून फायदा मिळवण्यात होत होता. बँक रिसिट स्कॅममध्ये त्यांनी ACC च्या शेअर ला 200 रुपयांवरून 9 हजार रुपयांपर्यंत नेले होते. अशीच वाढ इतर काही शेअर्समध्येही दिसत होती. शेअर्सच्या किमती वेगाने वाढत होत्या व त्यामागे असलेल्या मेहतांच्या करतुती कोणालाच दिसत नव्हत्या.

Harshad mehta Memes  (2)

भांडं फुटल अन् मार्केट पडलं (How did Harshad Mehta get caught?)

हर्षद मेहतांच्या बँकांसोबत सुरु असलेल्या या स्कॅममुळे बँकांच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये तफावत दिसू लागले. या तफावतींना बँक रिसिटचा पाठिंबा असल्याने त्यावर कोणाचेच लक्ष जात नव्हते. काहींनी जेव्हा कसून तपासणी केली तेव्हा त्यांना भल्यामोठ्या स्कॅमची एक छोटी बाजू दिसली. जानेवारी 1992 मध्ये RBI ने याची दखल घेण्यास सुरुवात केली. एप्रिलमध्ये RBI ला SBI बँकेच्या इन्वेस्टमेन्टमध्ये 649 कोटी रुपयांची तफावत आढळून आली. बँकेला त्यांनी दिलेल्या पैशांची सिक्युरिटी कधी मिळालीच नव्हती. या सगळ्यामागे होते ते हर्षद मेहता. SBI कडून दिल्या गेलेल्या दबावामुळे त्यांनी 13 एप्रिल ते 24 एप्रिल या फक्त 9 दिवसांच्या कालावधीत 620 कोटी रुपये बँकेला दिले. ही सेटलमेंट झाल्यानंतरदेखील RBI ने चौकशी चालू ठेवली व अनेक असे मेहतांचे घोटाळे उघडकीस येऊ लागले. या सर्व घोटाळ्यांमुळे सिक्युरिटीज मार्केट ढासळू (Securities Market Collasped) लागले. 

हर्षद मेहतांमुळे इतर ब्रोकर्सचे घोटाळेदेखील समोर येऊ लागले. मे महिन्यापर्यंत ही सगळी चौकशी CBI कडे गेली व त्यांनी मेहतांचे सगळे अकॉउंट बंद करून त्यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली. मेहतांच्या स्कॅमच्या बातम्या सगळीकडे पसरू लागल्या. तसे शेअर मार्केट धडाधड कोसळू लागले. एप्रिलमध्ये जो इंडेक्स 4,467 रुपयांवर होता तो थेट 2,500 रुपयांवर आला. इतका मोठा फटका बसल्यानंतर जानकीरामन समितीने या स्कॅमची आकडेवारी जाहीर करून अजून एक मोठा फटका सर्वाना दिला. त्यांनी जाहीर केल्यानुसार या स्कॅमची साईझ 4,024 कोटी रुपये एवढी (Harshad Mehta Scam Amount) होती. 

भारतातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याची ही गोष्ट होती. हर्षद मेहता ट्रेडर म्हणून उत्तम होते. परंतु मार्ग चुकीचा निवडल्याने त्यांच्या नावावर इतिहासात कायमचा कलंक लागला. त्यांच्यावर आधारित Scam 1992: The Harshad Mehta Story वेबसिरीज देखील आली. हर्षद मेहता यांच्यासारखे अनेक स्कॅम भारतात झाले व अजूनही होत असतील. अशावेळी नागरिक म्हणून आपण काय केले पाहिजे हा खरा प्रश्न आहे. कारण स्कॅम करून फायदा मिळवून देशातून पळून जाणारे जरी असले, तरी बुडणारे पैसे हे आपलेच असतात. होणारा तोटा हा आपला असतो. ही परिस्थिती आपल्या सर्वानाच माहिती आहे. पण असे असतानाही आपण गुंतवणूक करतोच. कारण आपण आपल्या देशातील व्यवस्थेवर विश्वास ठेवतो व तो कायम ठेवला पाहिजे. हाच एक ऑप्शन आपल्याकडे आहे.