Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

April GST Collection: महाराष्ट्राची घोडदौड सुरूच; GST संकलनात देशात नंबर वन

April GST Collection

महाराष्ट्र राज्य अव्वल असल्याचे जीएसटी कर संकलनाच्या आकडेवारीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सरकारी तिजोरीत सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जमा झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला काल 1 मे रोजी 63 वर्ष पूर्ण झाले. मागील 63 वर्षात राज्य प्रगतीपथावर असल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून आले. परकीय गुंतवणूकदारांकडूनही महाराष्ट्रालाच पहिली पसंती मिळत आहे.

April 2023 GST Collection: काल 1 मे (सोमवार) महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन 63 वर्ष पूर्ण झाले. या दिवशी कामगार दिनही साजरा केला जातो. या दिवसाला महाराष्ट्राच्या इतिहासात प्रचंड महत्त्व आहे. स्थापनेपासून महाराष्ट्राची घोडदौड सुरूच आहे. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाने उच्चांक गाठला असून देशभरातून 1.87 लाख कोटी रक्कम जमा झाली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य अव्वल असून मुंबईतून सर्वाधिक GST सरकारी तिजोरीत जमा झाला.

महाराष्ट्र कर संकलनात अव्वल

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर संकलनात देशात अव्वल ठरले. (Maharashtra GST collection) एप्रिल महिन्यात राज्यातून 33,196 कोटी रुपये कर सरकारी तिजोरीत जमा झाला. मागील वर्षी एप्रिल महिन्यात फक्त 27,495 कोटी रुपये कर जमा झाला होता. एप्रिल 2022 शी तुलना करता ही आकडेवारी 21 टक्के जास्त आहे. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू ही राज्ये कर संकलनात पुढे आहेत.

अर्थमंत्रालयाने काल वस्तू आणि सेवा कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली. एप्रिल महिना जीएसटी संकलनाचा उच्चांक ठरला. कोरोना काळात जीएसटी संकलन रोडावले होते. मात्र, आता बाजारपेठा सुरळीत झाल्याने पुन्हा करसंकलन वाढले आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात 1,67,540 लाख कोटी रुपये कर जमा झाला होता. त्यामध्ये 19,495 हजार कोटींची भर होऊन एकूण संकलन 1.87 लाख कोटी झाले. मार्च 2023 मध्ये 1.6 लाख कोटी कर संकलन झाले होते.

एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलनाची विभागणी

  • सेंट्रल जीएसटी (CGST) 38,440 कोटी रुपये
  • स्टेट जीएसटी (SGST) 47,412 कोटी रुपये 
  • IGST - 89,158 कोटी रुपये (आयातीवरील 34,972  जीएसटी मिळून)
  • सेस 12,025 (आयातीवरील 901 कोटींचा सेस मिळून)

मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या तुलनेत या वर्षी 12% जास्त जीएसटी कर संकलन झाले. देशांतर्गत व्यवहार आणि आयातीतून सर्वाधिक कर संकलन झाल्याचे सरकारने म्हटले आहे.

थेट परदेशी गुंतवणुकीतही महाराष्ट्र अव्वल

मागील 22 वर्षात महाराष्ट्र राज्य परदेशी गुंतवणूकदारांचे पसंतीचे राज्य ठरले आहे. वर्ष 2000 पासून 2022 या 22 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणुकीतून 1088502 कोटींची गुंतवणूक झाली. 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र स्थापनेला 63 वर्ष पूर्ण झाली. विकासात नंबर वन असल्याचे महाराष्ट्राने आपल्या प्रगतीतून सिद्ध करून दाखवले आहे.