वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या आज शनिवारी 18 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पेन्सिल आणि शार्पनरवरील जीएसटी कर कमी करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. तसेच राज्यांची जीएसटी परतावा लवकरात लवकर मिळावा ही मागणी मान्य करण्यात आली आहे. आजच 18 फेब्रुवारी रोजी केंद्र सराकरकडून जून 2022 या महिन्यात 16982 कोटी रुपयाचां जीएसटी परतावा राज्यांना अदा केला जाईल, अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
जीएसटी कौन्सिलची 49 वी बैठक आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कर चोरीला आळा घालणे, करांसंबधी वाद आणि तंटे यांच्याबाबत अपलीय न्यायाधिकरण स्थापण्याबाबत मंत्रिगटाने सादर केलेला अहवाल मान्य करण्यात आला आहे.
याशिवाय पेन्सिल आणि शार्पनरवरील जीएसटी कर कमी करण्याचा निर्णय आज परिषदेने घेतला. यामुळे पेन्सिल आणि शार्पनरच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. विशिष्ट ट्रॅकिंग डिव्हाईसवरील जीएसटी देखील कमी केला जाणार आहे. द्रवरुपातील गुळावरील जीएसटी कमी 18% वरुन शून्य करण्यात आला आहे. प्री पॅकिंग केलेल्या द्रवरुपातील गुळावर 5% जीएसटी द्यावा लागेल, असे सीतारामन यांनी सांगितले.
बैठकीतील ठळक मुद्दे
- आजच 18 फेब्रुवारी रोजी केंद्र सराकरकडून जून 2022 या महिन्यात 16982 कोटी रुपयाचां जीएसटी परतावा राज्यांना अदा केला जाईल
- अपिलीय न्यायाधिकरणासाठी सुधारित कृती आराखडा लवकरच सादर केला जाणार
- पेन्सिल आणि शार्पनरवरील जीएसटी कर कमी करण्याचा निर्णय आज परिषदेने घेतला.
- यामुळे पेन्सिल आणि शार्पनरच्या किंमती कमी होण्याची शक्यता
- ट्रॅकिंग डिव्हाईसवरील जीएसटी देखील कमी करण्याचा निर्णय
- द्रवरुपातील गुळावरील जीएसटी कमी 18% वरुन शून्य करण्यात आला आहे. प्री पॅकिंग केलेल्या द्रवरुपातील गुळावर 5% जीएसटी
- जीएसटीचा अॅन्युअल रिटर्न भरण्यास उशीर करणाऱ्यांना विलंब शुल्क कमी करण्याबाबत शिफारस
- पान मसालावर जीएसटी लागू करण्याचा अहवाल स्वीकारला