इंटरनेटच्या वाढत्या प्रसारासोबत सायबर हल्ल्यांचे प्रमाणही वाढत आहे. माहिती चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बँका, खासगी उद्योग आणि सरकारी आस्थापनांना माहिती सुरक्षिततेचे आव्हान उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारची इमेल प्रणाली 'कवच' वर सायबर हल्ला झाल्याचे एका अहवालात समोर आले आहे. सरकारी संस्थांना सायबर हल्लेखोरांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. सिक्युरोनिक्स कंपनीने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
सायबर हल्ल्याचा स्रोत
सरकारी पातळीवर सुरक्षित इमेल व्यवहार करण्यासाठी नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटरद्वारे 'कवच' ही टू फॅक्टर अथाँटिकेशन ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीवर हल्ला झाला. मात्र, हल्ल्याचा स्रोत नक्की समजला नाही. मात्र, साईडकॉपी या पाकिस्तानी हॅकर्स गटाकडून वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
सरकारी अधिकाऱ्यांकडून इमेलद्वारे होणारा पत्रव्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी मागील वर्षी NIC कडून कवच ही प्रणाली लागू करण्यात आली होती. सर्व अधिकाऱ्यांना या प्रणालीद्वारेच इमेलमध्ये लॉगइन करने अनिवार्य आहे. (2 Factor authentication) द्वारेच अधिकारी इमेल खात्याचा अॅक्सेस घेऊ शकतात. सरकारी माहिती चोरण्याचा सायबर हल्लेखोरांचा प्रयत्न होता.
बनावट लिंक मेलद्वारे सेंड करून सिस्टिममध्ये प्रवेश करण्याच प्रयत्न करण्यात आला होता. या लिंकवर क्लिक केल्यानंतर
लिंकमध्ये एक पीएनजी इमेज देखील समाविष्ट करण्यात आली होती. ही इमेज पाहताक्षणी सुरक्षित वाटू शकते. मात्र, त्यामध्ये एका ट्रोजन व्हायरसचा समावेश केला होता. त्याद्वारे सिस्टिममधील माहिती हॅक करता आली असती. याआधीही अनेक वेळा सरकारी माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नव्या वर्षात सरकार पृरस्कृत हॅकर्सचा धोका वाढल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले होते.