Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

STEL च्या अचानक उसळीचे काय आहे कारण, आठवड्याची सुरुवात मात्र घसरणीने

STEL

Image Source : www.indiatvnews.com

या आठवड्याच्या सुरुवातीला STEL मध्ये घसरण बघायला मिळाली. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीने मोठी उसळी घेतली होती.

सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडने (STEL) ही देशांतर्गत कंपनी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला STEL मध्ये घसरण बघायला मिळाली. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीने मोठी उसळी घेतली होती. कंपनीने गेल्या आठवड्यात बुधवारी एक महत्वाची माहिती दिली होती. कंपनीने बुधवारी आपल्याला नेपाळ सरकारकडून 143 कोटी रुपयांचा ठेका मिळाल्याची माहिती दिली होती.  ही बातमी बाहेर येताच शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्सना मोठी मागणी निर्माण झाली. परिणामी,  या शेअर्सची किमत मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आले. 

सालासार टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडने (STEL) शेअर बाजाराला सांगिले की, “हा ठेका 33/11 केव्ही सबस्टेशन आणि 33 केव्ही, 11 केव्ही, 400 व्ही लाइन आणि वितरण प्रणाली नेटवर्कचे डिझाइन आणि निर्मितीसह सामग्री, संबंधित सामान आणि आवश्यक स्थापना सेवांच्या खरेदीसाठी असणार आहे.”

STEL च्या शेअरला लागले होते अप्पर सर्किट

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना ही बातमी समजताच कंपनीच्या शेअर्सची किंमत झपाट्याने वाढू लागली होती. काही वेळांतच कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचे अप्पर सर्किटही लागले.बुधवारी सायंकाळी बीएसईव कंपनीचा शेअर 4.82 टक्यांच्या तेजीसह 52.15 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीची 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळी 58.30 रुपये एवढी आहे.बुधवारी सायंकाळी बीएसईव कंपनीचा शेअर 4.82 टक्यांच्या तेजीसह 52.15 रुपयांवर पोहोचला होता.  या शेअरची 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळी 58.30 रुपये एवढी आहे.नेपाळ विद्युत प्राधिकरणाचे (NEA) हे प्रकल्प शेजारील देशाच्या डांग, रुकुम पूर्व आणि बैतादी जिल्ह्यांत आहेत. हे काम 24 महिन्यांतच पूर्ण केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.STEL व्यवस्थापन संघाचे शशांक अग्रवाल यांनी म्हटले आहे, की, कंपनीने  भारताबाहेर हा पहिलाच ईपीसी (इंजिनिअरिंग, खरेदी आणि निर्माण) ठेका मिळवला आहे.

सोमवारी झाली घसरण 

सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला या शेअर्सच्या किमतीमध्ये घसरण होताना दिसून आली. सोमवारी बाजार बंद होत असताना  हा शेअर 49.45 रुपयांवर ट्रेड करत होता. सोमवारी 1.69 टक्क्यांची घसरण बघायला मिळाली.