Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सोशल मीडियाप्रमाणे Google Meet वरही वापरता येणार इमोजी!

Google Meet

Google Meet Emoji Feature: आता तुम्हाला Google Meet वर मिटिंग चालू असताना एकमेकांना इमोजीही पाठवता येणार आहे.

Google Meet Emoji Feature: सध्याच्या घडीला सोशल मीडिया न वापरणारा माणूस शोधून सापडणार नाही. सोशल मिडियावर आपली मते मांडणारी कित्येक लोकं तर आपल्या आजूबाजूलाच असतात. आता आशयसोबत लोक इमोजी(Emoji) मधून व्यक्त होत आहेत. अनेक सोशल माध्यमांमध्ये इमोजी वापरता येत आहेत. त्याचप्रमाणे आता Google Meet वरही इमोजी वापरता येणार आहेत.

Google Meet वरही इमोजी पाठवता येईल

कोविड महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम(WFH) ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर विकसित झाली आणि यामध्येच गुगल मीटचा सर्वाधिक वापर झाला. लॉकडाउनमुळे घरामधून काम करताना ऑफिसच्या मिटींग्स, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे क्लास ऑनलाईन गुगल मीटवर(Google Meet) होत होते. आता लॉकडाउन संपला असला तरीही ऑनलाईन मिटिंगची सवय तशीच राहिली आहे. आजही अनेक वेळा मिटिंगसाठी ऑनलाईन माध्यमाला प्राधान्य दिले जाते. आता ऑनलाईन मिटिंग घेणाऱ्या सगळ्यांसाठी गुगल मीटने(Google Meet) एक भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरचा वापर करून आता गुगल मीटमध्येही आपल्याला इमोजी शेअर करता येणार आहे.गुगल मीटवर(Google Meet) मिटिंग सुरू झाल्यावर, त्यामध्ये इमोजी शेअर करता येणार आहेत. टेकक्रंचच्या(TechCrunch) रिपोर्टनुसार गुगल मीटवर डाव्या बाजूला या इमोजीच्या रीऍक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील.

Group Chat ही करता येईल

या इमोजी(Emoji) कोण शेअर करत आहे हे देखील वापरकर्त्यांना जाणून घेता येणार आहे. याशिवाय गुगलकडून मीटवर वर्कस्पेस अपडेट देखील आणणार आहे. त्यामुळे लोकांना सहजपणे पर्सनल किंवा ग्रुप चॅट करता येणे शक्य होणार आहे. याआधी गुगल चॅटवर 'क्रिएट ग्रुप चॅट(Create Group Chat)' असा ऑप्शन देखील होता. त्याऐवजी आता वापरकर्त्यांना ग्रुप चॅट सुरू करण्यासाठी फक्त एकापेक्षा जास्त नावे टाईप करून ग्रुप क्रिएट करता येणार आहे किंवा एक नाव टाईप करून पर्सनल चॅट देखील करता येणार आहे.