Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vande Metro Train: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘वंदे भारत’ ट्रेननंतर आता ‘वंदे मेट्रो ट्रेन’ येणार असल्याची घोषणा

Vande Metro Train Update

Image Source : http://www.currentaffairs.adda247.com/

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेत 2.40 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा केली. तसेच रेल्वेमंत्री आश्र्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर 'वंदे भारत' ट्रेनच्या यशानंतर 2024-25 मध्ये 'वंदे मेट्रो' ट्रेन सुरू करणार असल्याची माहिती दिली.

Vande Metro Train Update: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी दिली आहे. काल अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी रेल्वेत 2.40 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. तसेच रेल्वेमंत्री आश्र्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर जाहीर केले की, वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर 2024-25 मध्ये वंदे मेट्रो ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.  

वंदे मेट्रोची संकल्पना (Concept of Vande Metro)

रेल्वेमंत्री आश्र्विनी वैष्णव यांनी भारत ट्रेनच्या यशानंतर 2024-25 मध्ये वंदे मेट्रो ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही मेट्रो विविध शहरात 50 ते 60 किमी अंतर कापण्याची संकल्पना आहे. यंदा या वंदे मेट्रोचे उत्पादन व डिझाइनवर काम करण्यात येणार आहे. या ट्रेनचे प्रत्यक्ष नियोजन पुढील वर्षापासून सुरू करणार आहोत. ही वंदे मेट्रो ट्रेन 125 ते 130 प्रति किलोमीटर वेगाने धावणार आहे. या ट्रेनची रचना मुंबई उपनगरांना समोर ठेऊन करण्यात येणार आहे. तसेच या ट्रेनमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध नसणार आहे.

वंदे मेट्रो ट्रेनची खासियत (Specialties of Vande Metro Train)

वंदे मेट्रो ट्रेन ही 1950 ते 1960 च्या दशकात डिझाइन केलेल्या अनेक ट्रेनची जागा घेण्याची शक्यता आहे. या ट्रेनच्या डिझाइनबाबत अदयाप कोणत्याही माहितीचा खुलासा करण्यात आला नाही. मात्र या ट्रेनमधील काही सुविधा या वंदे भारत ट्रेनसारख्या असणार आहेत. प्रदुषणाबाबत काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे या ट्रेनचे इंजिन हायड्रोजन आधारित असणार आहे. तसेच प्रवाशांना येणाऱ्या स्टेशनची माहिती कळावी यासाठी आधुनिक तंत्राचादेखील वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ट्रेनचे भाडे खूप कमी असणार आहे.