Gold- Silver Price 17 Jan 2023: नवीन वर्ष सुरु झाल्यापासून भारतीय सराफा(MCX) बाजारात मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या किंमतीमध्ये(Gold Price) दरवाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाली होती मात्र आज(मंगळवारी 17 जानेवारी 2023) भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चला तर आजचे सोन्या चांदीचे दर जाणून घेऊयात.
आजचा सोने चांदीचा दर काय?
आज भारतीय सराफा बाजारात(MCX) सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावरून 56,825 रुपयांवर घसरला आहे. सोमवारी प्रति 10 ग्रॅम 56,883 रुपये असा उच्च विक्रमी दर नोंदवण्यात आला होता. कालच्या तुलनेत आज प्रति तोळ्यामागे 58 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्याचवेळी चांदी 118 रुपयांनी स्वस्त होऊन 69,049 रुपयांवर आली आहे. आज सराफा बाजारात जीएसटीसह(GST) 24 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 58,529 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,052 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ हे अॅप बनविण्यात आले आहे. याच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपच्या माध्यमातून लगेच त्याबद्दल तक्रार नोंदवू शकतात.
हे देखील माहिती असावे
- 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिण्यात येते
- 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिण्यात येते
- 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिण्यात येते
- 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिण्यात येते
- 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिण्यात येते