भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने मंगळवारच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढले आहे. 1 किलो चांदीचा भाव 970 रुपयांनी वाढले आहेत. बुधवरीही सोने-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली होती. या आठवड्याची सुरुवात होताना सोमवारी दहा ग्रॅम सोने गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या तुलनेत 77 रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र या आठवड्यात रोज दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. चांदीचे दरही या आठवड्याच्या सुरुवातीला खाली आले होते. शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी एक किलो चांदीचा दर 375 रुपयांनी खाली आला होता. मात्र या आठवड्यात चांदीच्या दरातही रोज वाढ होत आहे. गुरुवारी 1 डिसेंबर रोजीही बुधवारच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
सोन्याचा दर (Gold Rate Today)
गुरुवारी मार्केट क्लोज झाल्यावर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 53 हजार 70 रुपयांवर बंद झाले आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 48 हजार 987 इतके आहेत. 10 ग्रॅम 20 कॅरेट सोन्याचे दर 44 हजार 533 रुपये इतके आहेत. 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचे दर 40 हजार 80 इतके, 10 ग्रॅम 16 कॅरेट सोन्याचा दर 35 हजार 627 इतके, 10 ग्रॅम 14 कॅरेट सोन्याचे दर 31 हजार 171 इतके, 10 ग्रॅम 12 कॅरेट सोन्याचे दर 26 हजार 720 रुपये इतके, 10 ग्रॅम 10 कॅरेट सोन्याचे दर 22 हजार 267 रुपये इतका दर गुरुवार अखेर आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारीही चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. 1 किलो चांदीच्या किमतीत 970 रूपयांनी वाढ होत हे दर 64 हजार 360 रुपये इतके झाले आहेत.