Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mera Bill Mera Adhikar योजनेत जीएसटी बिल ॲपवर अपलोड करून मिळवा 1 कोटींपर्यंतची बक्षिसे

Mera Bill Mera Adhikar

सामान्य ग्राहकांनी जीएसटी भरून बिले घ्यावीत, त्यांना यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ही योजना आणली गेली आहे. इनव्हॉइस इन्सेंटिव्ह स्कीम (Invoice Incentive Scheme) अंतर्गत, जे ग्राक किरकोळ विक्रेते किंवा घाऊक विक्रेत्यांकडून घेतलेले जीएसटी बिल ॲपवर अपलोड करतील त्यांना एका सोडतीद्वारे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये वस्तू आणि सेवा कराबाबत जनजागृती करण्याबाबत भारत सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) चोरी रोखण्यासाठी सरकारनेवेगवेगळ्या उपाययोजना आखल्या आहेत. तसेच करचोरी करणाऱ्यांच्या विरोधात थेट कारवाई देखील केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेत सहभाग घेणाऱ्यांना थोडेथोडके नाही तर 10 लाखांपासून 1 कोटींपर्यंतची बक्षिसे मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊया, ही योजना नेमकी आहे काय…

मेरा बिल मेरा अधिकार 

केंद्र सरकारने ‘मेरा बिल मेरा अधिकार’ (Mera Bill Mera Adhikar) नावाने एक नवी योजना आणली आहे. याच नावाने केंद्र सरकारने एक मोबाईल ॲप सुरु केले आहे. या अंतर्गत सामान्य नागरिकांना मोबाईल ॲपवर किरकोळ किंवा घाऊक व्यापाऱ्यांकडून मिळालेले GST इनव्हॉइस अपलोड करायचे आहे.  GST इनव्हॉइस अपलोड करणाऱ्या काही निवडक नागरिकांना 10 लाख ते 1 कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळू शकणार आहे.

कुणाला मिळेल बक्षीस?

ही योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सामान्य ग्राहकांनी जीएसटी भरून बिले घ्यावीत, त्यांना यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ही योजना आणली गेली आहे. इनव्हॉइस इन्सेंटिव्ह स्कीम (Invoice Incentive Scheme) अंतर्गत, जे ग्राक किरकोळ विक्रेते किंवा घाऊक विक्रेत्यांकडून घेतलेले जीएसटी बिल ॲपवर अपलोड करतील त्यांना एका सोडतीद्वारे रोख बक्षीस दिले जाणार आहे. ही सोडत मासिक किंवा त्रैमासिक आधारावर काढली जाणार आहे. या सोडतीत 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे ग्राहकांना दिली जाणार आहेत.

दर महिन्याला निघेल सोडत  

या योजनेत दर महिन्याला सोडत काढली जाणार असून, यात कुठललाही मानवी हस्तक्षेप नसेल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ‘Mera Bill Mera Adhikar’ हे मोबाईल ॲप iOS आणि Android या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, ग्राहकांना ते डाऊनलोड करून त्यात ग्राहकांचे डीटेल्स भरावे लागणार आहेत. त्यांनतर ग्राहक या ॲपवर त्यांनी दुकानदारांकडून घेतलेली जीएसटी बिले अपलोड करू शकतील. 

एका महिन्यात किमान 1 आणि कमाल 25 जीएसटी बिले ग्राहकांना अपलोड करता येणार आहेत. अपलोड केली जाणारे बिले 200 रुपयांपेक्षा अधिक असायला हवीत असे देखील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.