Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PTC India मधील हिस्सा खरेदीसाठी गौतम अदानींकडून मोठी बोली लावण्याची शक्यता!

PTC India Limited

Image Source : www.japantimes.co.jp

केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली देशातील सर्वांत मोठी पॉवर ट्रेडिंग कंपनी पीटीसी इंडिया लिमिटेड (PTC India Ltd) मधील काही सरकारी कंपन्या आपल्या हिस्सा विकत असून, तो खरेदी करण्यात गौतम अदानी यांनी रुचि दाखवली आहे.

केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली देशातील सर्वांत मोठी पॉवर ट्रेडिंग कंपनी पीटीसी इंडिया लिमिटेड (PTC India Ltd) मधील काही सरकारी कंपन्या आपल्या हिस्सा विकण्याचा विचार करत आहेत. तर हा हिस्सा खरेदी करण्यात गौतम अदानी यांनी रुचि दाखवली आहे. पीटीसीसाठी भारतातली इतर बिझनेस ग्रुपसुद्धा इच्छुक आहेत.

पीटीसी इंडियामध्ये केंद्र सरकारची मालकी असलेल्या कंपन्या आहेत. यात एनटीपीसी लिमिटेड (NTPC Ltd), एनएचपीसी लिमिटेड (NHPC Ltd), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (Power Grid Corporation of India) आणि पॉवर फायनान्स कॉर्प (PFC) या कंपन्यांची 4-4 टक्के भागीदारी आहे. या सर्व कंपन्यांनी आपल्या हिस्सा विकण्याची तयारी सुरू केली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या महिन्याच्या शेवटच्या दिवसात या कंपन्यांच्या खरेदीवर बोली लागू शकते.

अदानी ग्रुपने जर पीटीसी इंडियामधील हिस्सा खरेदी करण्यात बाजी मारली तर देशाच्या ऊर्जा उद्योगावर आणि एकूणच ऊर्जा विभागावर अदानी समुहाचे वर्चस्व राहील. कोळसा खाणी, ट्रेडिंग बिझनेस आणि अदानी ट्रान्समिशनच्या माध्यमातून वीज पारेषण आणि वितरण सेक्टरमध्ये अदानी समुहाचे वर्चस्व आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ही चर्चा प्राथमिक स्तरावर आहे आणि कदाचित यासाठी बोलीसुद्धा लावली जाणार नाही, असे म्हटले आहे.

पीटीसी इंडिया ही कंपनी पूर्वी पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PTC-Power Trading Corporation of India) या नावाने ओळखली जात होती. 1999 मध्ये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप अंतर्गत या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीने 2001 पासून ऊर्जा विभागात ट्रेडिंग सुरू केली होती. भारताच्या ऊर्जा बाजारात या कंपनीचा सर्वात मोठा वाटा आहे. कंपनीच्या यादीमध्ये भारतातील सर्व सरकारी वीज कंपन्या आणि जवळच्या देशातील कंपन्याही सामील आहेत.

PTC Indiaच्या शेअर्समध्ये घसरण

पीटीसी इंडियाच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरापासून 23.1 टक्क्यांची घसरण झाली. या कंपनीची बाजारातील भांडवल 301 मिलियन डॉलरच्या जवळपास आहे. पीटीसी इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या एनटीपीसी लिमिटेड (NTPC Ltd), एनएचपीसी लिमिटेड (NHPC Ltd), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (Power Grid Corporation of India) आणि पॉवर फायनान्स कॉर्प (PFC) या कंपन्यांची 4-4 टक्के भागीदारी आहे. ही हिस्सा या कंपन्या विकण्याच्या तयारीत आहेत. पण पीटीसी इंडियाच्या प्रतिनिधीने मात्र याबाबत कंपनीकडे काही माहिती नसल्याचे सांगितले आहे.