Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gautam Adani : गौतम अदानींनी 2022 मध्ये कमाईच्या बाबतीत पाकिस्तानी शेअर बाजारालाही टाकले मागे!

Gautam Adani

Image Source : www.dawn.com

ह्या वर्षी गौतम अदानी (Gautam Adani, Industrialist) यांचे नाणे चांगलेच खणाणले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही ते काही काळ दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 2022 वर्ष संपणार आहे आणि यावेळी अदानी 116 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

ह्या वर्षी गौतम अदानी (Gautam Adani, Industrialist) यांचे नाणे चांगलेच खणाणले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही ते काही काळ दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 2022 वर्ष संपणार आहे आणि यावेळी अदानी 116 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये नुकतीच घसरण झाली असली तरी गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात मोठी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, या वर्षी अदानी यांनी त्यांच्या संपत्तीमध्ये (Gautam Adani Networth) $ 39.9 अब्ज जोडले आहेत. विशेष बाब म्हणजे जगातील टॉप-10 अब्जाधीशांपैकी ते एकमेव आहेत ज्यांच्या संपत्तीत यावर्षी वाढ झाली आहे. 2022 हे वर्ष उद्योगांसाठी काही खास नव्हते. वर्षभरात शेअर बाजारात जोरदार विक्री झाली आणि जागतिक मंदीची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली.

जगातील 64 व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या समतुल्य आहे ही संपत्ती

2022 हे वर्ष जगासाठी कसेही असले तरी गौतम अदानी यांनी या वर्षात भरपूर कमाई केली. 2021 IMF च्या अंदाजांवर आधारित नाममात्र GDP च्या बाबतीत गौतम अदानी यांची संपत्ती जगातील 64 व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीची झाली आहे. अदानी यांनी या वर्षी आपल्या संपत्तीत जेवढी वाढ केली आहे ती किमान 85 देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.

पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या मार्केट कॅपपेक्षा जास्त

एवढेच नाही तर गौतम अदानी यांची यावर्षीची कमाई पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंजच्या मार्केट कॅपपेक्षा जास्त आहे. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजची एम-कॅप सुमारे $30 अब्ज आहे.

फॉरेन एक्स्चेंज रिझर्व्हच्या एक पंचमांश इतके

याशिवाय अदानी यांची संपत्ती भारताच्या परकीय चलनाच्या साठ्याच्या एक पंचमांश इतकी आहे. भारताचा परकीय चलन साठा सुमारे 563.50 अब्ज डॉलर आहे.

या क्षेत्रांमध्ये व्यवसाय पसरला

60 वर्षीय गौतम अदानी रिन्युएबल एनर्जी,  पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक, एअरपोर्ट अँड डिफेन्स सेक्टर मध्ये आपला व्यवसाय पसरवत आहेत.

150 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती संपत्ती

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची संपत्ती 20 सप्टेंबर रोजी 150 अब्ज डॉलरवर पोहोचली. त्यानंतर त्यात काहीशी घट झाली. त्याच वेळी, भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 86.9 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत.

सहा शेअर्सनी 6.78 लाख कोटी रुपयांची भर घातली

अदानी समूहाच्या सहा शेअर्सनी या वर्षात आतापर्यंत एकूण 6.78 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलात भर घातली आहे. अदानी समूहाचा महत्त्वाचा स्टॉक असलेल्या अदानी विल्मरची या वर्षी 8 फेब्रुवारीला नोंदणी झाली. त्याचे मार्केट कॅप 33,720 कोटी रुपयांवरून 68,187.64 कोटी रुपये झाले आहे.

अदानी पॉवरचा शेअर 176 टक्क्यांनी वाढला

अदानी पॉवरच्या शेअरमध्येही मोठी उसळी आली आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी तो 99.75 रुपये होता. यानंतर, तो 176 टक्क्यांच्या उसळीसह 275.35 रुपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 117 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय अदानी टोटल गॅसचे शेअर्स 93 टक्क्यांनी, अदानी ट्रान्समिशनचे 42 टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जीचे 41 टक्क्यांनी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढले आहेत.