Adani - Musk : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सोमवारी मोठी घसरण झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी आणि इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात सुमारे 25.1 अब्ज डॉलरची घट झाली. भारतीय रुपयात त्याचे मूल्य 20,44,06,87,00,000 रुपये आहे. (Decline in Adani & Musk's wealth)
एका दिवसात अदानीला 9.67 डॉलर गमवावे लागले. भारतीय रुपयात त्यांचे 7,87,48,12,85,000 रुपयाचे नुकसान झाले. अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन आणि अदानी गॅसच्या विविध अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. या घसरणीसह ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार गौतम अदानी संपत्तीच्या बाबतीत बर्नार्ड अर्नॉल्टपेक्षा (Bernard Arnault) मागे पडले आहेत.
या निर्देशांकात अदानी आता तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आले आहे. (Gautam Adani) गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता 120 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात 97,72,26,00,00,000 रुपये इतकी आहे. (Adani Group)
नाव | एकूण संपत्ती | शेवटचा बदल | YTD बदल | देश | उद्योग |
इलॉन मस्क | $223 B | $-15.5 B | $-47.8 B | US | टेक्नॉलॉजी |
जेफ बेजोस | $139 B | $+2.97 B | $-53.6 B | US | टेक्नॉलॉजी |
बर्नार्ड अर्नॉल्ट | $130 B | $-297 M | $-47.7 B | US | CONSUMER |
गौतम अदाणी | $120 B | $-9.67 B | $+43.9 B | India | इंडस्ट्रियल |
बिल गेट्स | $107 B | $+1.90 B | $-30.9 B | US | टेक्नॉलॉजी |
इलॉन मस्कच्या संपत्तीत 15.5 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात 12,62,32,00,00,000 रुपयाची घट झाली आहे.
शेअर्सच्या घसरलेल्या किमतींमुळे जगातील सर्वात(Rich Person) श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. (Tesla Company)टेस्ला कंपनीचे शेअर्स मंगळवारी सुमारे 8.61 टक्क्यांनी घसरून बंद झाले. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी आणि एलोन मस्क सोमवारी सर्वाधिक संपत्ती गमावलेल्या अब्जाधीशांच्या यादीत होते.
अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले
सोमवारी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या कालावधीत, अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) चे शेअर्स सुमारे 7.90 टक्क्यांनी घसरले आणि ते सुमारे 3076 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, अदानी पॉवरचा समभाग 4.99 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 354.85 रुपयांवर बंद झाले. त्यासोबतच अदानी विल्मारमध्ये 5 टक्क्यांनी लोअर सर्किट होऊन ते 717.75 रुपयांवर बंद झाले. अदानी एंटरप्रायझेस 8.42% घसरून 3164.75 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी अदानी पोर्ट 4.35 टक्क्यांनी घसरून 784.95 वर आणि अदानी ग्रीन एनर्जी 7.65 टक्क्यांनी घसरून 2087.85 रुपयांवर बंद झाले.(Adani Green Energy)