जगातील श्रीमंताच्या यादीत काही दिवसांपूर्वी मोठे बदल झाले होते. उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकण्यात आले होते. अॅमेझॉनचे जेफ बेझोस त्यांना मागे टाकून पुढे गेले होते. आता मात्र पुन्हा या यादीत मोठा बदल झाला आहे. जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गुरुवारी मोठा फेरबदल झाल्याचे दिसून आले. अॅमेझॉनचे सह-संस्थापक जेफ बेझोस भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकून जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. मात्र 24 तासांच्या आत गौतम अदानी यांनी पुन्हा तिसरे स्थान मिळवले आहे.
शेअर्सच्या मूल्यातील वाढ आणि घसरण यातून हे बदल होत असलेले बघायला मिळतात. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, गौतम अदानी यांच्या समभागांच्या घसरणीमुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 118 अब्ज डॉलर झाली होती. तसेच, Amazon चे प्रमुख Jeff Bezos Wealth 5.23 अब्ज डॉलर्सने वाढली होती. त्यामुळे अब्जाधीशांच्या यादीत बदल होत बेझोस यांनी अदानी यांना मागे टाकून जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते.
शेअर्सच्या किमतीत सतत बदल होत असतात. यामुळे 24 तासात ही क्रमवारी बदलली . गेल्या 24 तासांत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आणि या वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती 119 अब्ज डॉलर इतकी झाली. अदानी समूहाचे अध्यक्ष असणारे गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. बेझोस पुन्हा 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
गेल्या वर्षी 2022 मध्ये गौतम अदानी हे एकमेव अब्जाधीश होते ज्यांनी भरपूर कमाई करत आपली संपत्ती वाढवली होती. एका वर्षात त्यांची एकूण संपत्ती सुमारे 40 बिलियन डॉलरने वाढली होती. ते नंबर-2 श्रीमंतांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट 184 अब्ज डॉलर संपत्तीसह सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. दुसरीकडे, इलॉन मस्क 132 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या आणि गौतम अदानी 119 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. अतिश्रीमंतांमध्ये, जेफ बेझोस 118 बिलियन डॉलरसह चौथे, तर वॉरेन बफे 111 बिलियन डॉलरसह पाचव्या स्थानावर राहिले. बिल गेट्स 111 अब्ज डॉलर्ससह सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि लॅरी एलिसन हे 98.2 अब्ज डॉलर्ससह सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले.
या यादीत समाविष्ट असलेले दुसरे भारतीय उद्योगपती रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत दीर्घकाळ आठव्या स्थानावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 85.7 अब्ज डॉलर आहे. 85.5 अब्ज डॉलर्ससह स्टीव्ह बाल्मर जगातील नवव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहेत. लॅरी पेजचे नाव 85.3 अब्ज डॉलर्सच्या श्रीमंतांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            