Union Budget 2023: नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) यांच्या काळातील हे नववे बजेट असून निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी सलग पाचव्यांदा हा अर्थसंकल्प सादर केला आहे. केंद्रातील मोदी सरकारचा हा निवडणूकपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने सर्वांचेच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी पीएम आवास(PM Awas Yojana) योजनेसाठी तब्बल 79 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी आता आर्थिक सहायय मिळणार आहे. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान आवास योजनेसाठी 79 हजार कोटींचा निधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी यावेळी पीएम आवास(PM Awas Yojana) योजनेसाठी तब्बल 79 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. हा निधी मागील वर्षीच्या निधीपेक्षा एकूण 66 टक्क्यांहून अधिक आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठीचा निधी 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी केल्याने सरकारला सर्वसमावेशक आणि शेवटच्या घटकापर्यंतचे विकास ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे. यामुळे यापुढे घर खरेदी करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात मिळाली होती इतकी तरतूद
2022-23 या आर्थिक वर्षात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (PMAY) 48,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. देशातील सर्व लोकांना हक्काचे घर देणे हे प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना घरांचे वाटप केले जाते. ज्यांच्याकडे कायमस्वरूपी घर नाही अशा लोकांना घरे दिली जातात. गृहनिर्माण योजनेंतर्गत यादी तयार करताना लाभार्थीकडे दुचाकी किंवा तीनचाकी वाहन नाही याची तपासणी सुद्धा केली जाते. यासोबतच इतरही अनेक मानके निश्चित करूनच या योजनेचा लाभ देण्यात येतो.