• 02 Oct, 2022 08:29

1 जुलैपासून हे 4 नियम बदलणार; तुमच्या खिशावर ताण येणार!

inflation

Financial Rules Change : 1 जुलैपासून सरकारी योजना, बॅंका आणि टॅक्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याची पूर्तता केली नाही तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

1 जुलै, 2022 पासून बरेच आर्थिक बदल होत आहेत. जुलै महिना सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 1 जुलैपासून तुमच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यात तुमचा ईएमआय (EMI) महाग होणार आहे. तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग (Trading in Cryptocurrency) करत असाल तर तुमची अडचण वाढणार आहे. तसेच डीमॅट खाते (Demat Account) आणि पॅन-आधारशी (Pan-Aadhar Linking) संबंधित सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. चला तर पाहुयात 1 जुलै, 2022 पासून काय-काय बदल होणार आहेत.

Aadhar-Pan Card Linking : 

pan link to adhar

जर तुम्ही अद्याप तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत 30 जून 2022 पूर्वी हे काम करा. कारण 30 जूननंतर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 1 एप्रिल, 2022 पासून आधारला पॅन क्रमांकाशी जोडण्यासाठी 500 रुपये दंड आकारला जात आहे. पण तुम्ही जर 30 जून, 2022 पर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला 1 जुलैपासून 1 हजार रुपये दंड भरावा लागेल. 31 मार्च, 2023 पर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करू शकतात. मात्र, त्यासाठी 1 हजार रूपये दंड भरावा लागणार आहे.

Home Loan EMI :

home loan interest

1 जुलै 2022 पासून, ज्यांची होम लोनची रीसेट तारीख 1 जुलै 2022 आहे. त्यांचा EMI महाग होणार आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील सर्व प्रमुख बॅंकांनी आणि गृहनिर्माण वित्तीय कंपन्यांनी होम लोन महाग केले. तसेच ज्यांची होम लोन रीसेट तारीख 1 जुलै आहे; त्यांना या महिन्यापेक्षा जास्त EMI भरावा लागणार आहे. समजा तुम्ही यापूर्वी 20 वर्षांसाठी 7.25 टक्के व्याजदराने 20 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्हाला 15,808 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. आता गृहकर्जावरील व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी वाढवल्यानंतर, तुम्हाला 7.75 टक्के दराने 16,419 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच दरमहा 611 रुपये अधिक आणि वर्षभरात 7332 रुपयांचा अतिरिक्त बोजा खिशावर पडणार आहे.

TDS On Cryptocurrency : 

tds on crypto

क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांना 1 जुलै, 2022 पासून मोठा झटका बसणार आहे. 1 जुलै, 2022 पासून सर्व क्रिप्टो व्यवहारांवर 1 टक्के TDS भरावा लागणार आहे. मग यात गुंतवणूकदाराला नफा होऊ किंवा तोटा. तसेच 2022-23 या वर्षापासून क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के भांडवली नफा कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Demat Account KYC : 

DMAT

जर तुम्ही तुमच्या डीमॅट ट्रेडिंग खात्याचे केवायसी केले नसेल, तर आता तुमच्याकडे 30 जून 2022 पर्यंत वेळ आहे. तुम्ही 30 जूनपर्यंत डीमॅट ट्रेडिंग खात्यासाठी केवायसी करून घेऊ शकता. SEBI च्या मते, विद्यमान डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खात्याचे KYC 30 जून 2022 पर्यंत केले जाऊ शकते. जे डिमॅट खातेधारक आतापर्यंत त्यांच्या डिमॅट खात्याचे केवायसी करू शकले नाहीत; त्यांना आता केवायसी करावेच लागेल. प्रत्येक डिमॅट खातेधारकाला नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, उत्पन्न मर्यादा यासह KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे.