Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

वाढत्या महागाईतही कमी व्याजाने होम लोन मिळवा!

home loan with less interest

देशातील सर्व प्रमुख बॅंकांचे कर्जाचे व्याज दर वाढलेले असताना ही तुम्ही कमी व्याजदरात नवीन होम लोन (Home Loan) किंवा पूर्वीच्या कर्जाचा व्याजदर (Loan Interest Rate) कमी करू शकता.

2022-23 या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात (RBI Repo Rate) दोनदा वाढ केली. सर्वप्रथम 4 मे रोजी आरबीआयने 40 बेसिस पॉईंटने, त्यानंतर 8 जून रोजी पुन्हा एकदा आरबीआयने 50 बेसिस पॉईंटने वाढ केली. त्यामुळे देशातील सर्व बँकांनी गृहकर्ज (Home Loan) महाग केली. पूर्वीपासून सुरू असलेली कर्ज आणि नवीन घेतली जाणारी कर्ज अशा दोन्हींचे व्याजदर वाढले आहेत.

देशातील सर्व प्रमुख बॅंकांचे कर्जाचे व्याज दर वाढलेले असताना तुम्हाला होम लोन घ्यायचे असल्यास किंवा पूर्वीपासून सुरू असलेल्या कर्जाचा व्याजदर कमी करता येऊ शकतो. कारण बऱ्याच बॅंका नवीन कर्ज देताना व्याजदरात सूट देतात. तसेच नवीन ग्राहकांना विविध प्रकारच्या ऑफर्सही देत असतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कर्जावरील व्याज कमी किंवा वाचवू शकता. पण बहुतांश अशा ऑफर्समध्ये अटी असतात. या अटींची पूर्तता झाल्यावरच बॅंका कमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. व्याजदर कमी करण्याचे असेच आणखीही काही पर्याय आहेत.

महिलांना विशेष सवलत

भारतातील अनेक बँका महिलांसाठी विशेष योजना राबवत असतात. यात बऱ्याच बॅंका महिलांना कमी व्याजदराने गृहकर्ज देतात. कर्ज घेताना पहिले नाव महिलेचे असेल किंवा कर्ज घेतली जाणारी मालमत्ता महिलेच्या नावावर असेल तर तिला विशेष व्याजदर दिले जातात. या विशेष व्याजदराचा फायदा घेण्यासाठी तुम्ही नव्याने कर्ज घेताना संबंधित मालमत्तेत महिलेचे नाव जोडून संयुक्तपणे कर्ज घेऊ शकता. याचबरोबर महाराष्ट्रात महिलेच्या नावावर मालमत्ता किंवा घर असेल तर तिला नोंदणी शुल्कात 1 टक्क्याची सूट सुद्धा मिळते. कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग ठरू शकतो.

प्री-अ‍ॅप्रुव्ह ऑफर पाहा

कोणत्याही बॅंकेतून कर्ज घेताना बँकेकडून तुमच्यासाठी तयार करण्यात आलेली किंवा तुम्हाला देऊ केलेली प्री-अ‍ॅप्रुव्ह ऑफर तपासा. कारण प्रत्येक बँका आपल्या ग्राहकांसाठी विशेष व्याजदर देत असतात. या ऑफरचाही तुम्ही फायदा घेऊ शकता.

रिफायनान्सिंग करा

रेपो दर वाढल्यानंतर तुमचे सध्या सुरू असलेले होमलोन महागल्यास तुम्ही ते रिफायनान्स करून कमी करू शकता. जुन्या ग्राहकांऐवजी बॅंका नवीन ग्राहकांसाठी वेळोवेळी व्याजदराची सवलत देत असते. या सवलतीचा फायदा घेत रिफायनान्सिंगद्वारे तुम्ही तुमचे सध्या होम लोन दुसऱ्या बॅंकेत शिफ्ट करून सवलतीच्या व्याजदराचा फायदा घेऊ शकता.

कमीतकमी रकमेचे कर्ज घ्या

कर्जाची रक्कम जितकी कमी असेल तितका व्याजदर कमी द्यावा लागतो. किमान 30 लाख रूपयांपर्यंतच्या होम लोनवर मिनिमम व्याज द्यावे लागते. कर्जाची रक्कम 30 लाखाच्या पुढे गेली तर व्याजदर ही वाढतो. त्यामुळे शक्यतो होम लोन घेताना कर्जाची रक्कम किमान किंवा 30 लाखापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करावा.

क्रेडिट हिस्ट्री चांगली ठेवा

कर्ज घेताना ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री किंवा क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा मानला जातो. तुमचा क्रेडिट स्कोअर जर चांगला असेल तर कर्ज लगेच मिळण्यास मदत होते. तसेच बॅंकांच्या धोरणानुसार क्रेडिट स्कोअरनुसार विशेष व्याज दर ही मिळू शकतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट हिस्ट्री चांगली ठेवा. यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळण्यास मदत होऊ शकेल.