आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर हे काम 30 जून 2022 पूर्वी करा. कारण 30 जूननंतर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल. 1 एप्रिल 2022 पासून आधारला पॅन क्रमांकाशी जोडण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागतो. परंतु जर तुम्ही 30 जून 2022 पर्यंत लिंक केले नाही तर तुम्हाला 1 जुलैपासून 1,000 रुपये दंड भरावा लागेल. मार्च महिन्यात,केंद्रीय थेट कर मंडळ (Central Board of Direct Taxes - CBDT) ने एक अधिसूचना जारी केली होती की 1 एप्रिल 2022 पासून, आधारशी पॅन लिंक करण्यासाठी दंड भरावा लागेल.
31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यास मुदत
1 एप्रिलनंतर पहिल्या तीन महिन्यांत, म्हणजे 30 जूनपर्यंत,आधारशी पॅन लिंक करण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागेल. या कालावधीनंतर लिंक केल्यास 1000 रुपये दंड भरावा लागेल. त्याच वेळी, CBDT ने म्हटले आहे की करदात्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, त्यांना ही सुविधा दिली जात आहे. जास्त दंड भरून 31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करू शकतात.वास्तविक, दंडाशिवाय आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत होती. तेव्हा लिंक करण्यासाठी कोणतेही शुल्क नव्हते. आधारला पॅनशी लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल, असे सरकारकडून पूर्वी सांगण्यात आले होते. पण 31 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अशा प्रकारे आधार आणि पॅन कार्ड लिंक करा
- इन्कम टॅक्स वेबसाईटच्या होम पेजवरील क्विक लिंक्स (Quick Links) या टॅबवरील लिंक आधार (Link Aadhar) यावर क्लिक करा.
- Link Aadhar वर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल.
- इथे तुम्हाला सर्वप्रथम पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, आधार कार्ड जसे नाव आहे तसेच इथेही टाकायचे आहे. आणि शेवटी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे टीकमार्क करून द्यायची आहेत. पहिला प्रश्न आधार कार्डवर फक्त जन्म तारखेचे वर्ष आहे. दुसरा प्रश्न या प्रक्रियेसाठी आधार कार्डवरील माहिती तपासण्यासाठी मी तुम्हाला संमती देत आहे.
- त्यानंतर लिंक आधार या बटनावर क्लिक केले की, तुमची प्रक्रिया पूर्ण होते.
अशाप्रकारे तुम्ही तुमचे आधार पॅन कार्डला लिंक करू शकता.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            