Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

30 जून पर्यंत डिमॅट खात्याचे केवायसी अनिवार्य

kyc update dmat account

तुम्ही तुमच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे (Demat and Trading Account) केवायसी ( KYC) केले नसेल, तर आता तुमच्याकडे 30 जून 2022 पर्यंत वेळ आहे. तसे न केल्यास 1 जुलै पासुन डीमॅट आणि ट्रेडिंग खाते बंद होऊ शकते.

कोरोनाच्या काळात अनेक नवीन गुंतवणूकदारांनी शेअर्स मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. हे शेअर्स ज्या मार्फत खरेदी केले जातात त्या डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे केवायसी करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे केवायसी (Know Your Customer KYC) केले नसेल, तर आता तुमच्याकडे 30 जून 2022 पर्यंत वेळ आहे. तुम्ही 30 जूनपर्यंत डिमॅट ट्रेडिंग खात्यासाठी केवायसी करून घेऊ शकता. सेबीच्या (Securities and Exchange Board of India SEBI) मते, शेअर बाजाराचे नियामक, विद्यमान डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खात्याचे केवायसी (KYC) 30 जून पर्यंत केले जाऊ शकते. 

केवायसी न केल्यास काय होणार

एनएसडीएलने (National Securities Depository Limited NSDL) केवायसी (KYC) नसलेले डिमॅट खाते बंद (Deactivate) करण्याचे आदेश जारी केला होता. परंतु सेबी (SEBI) आणि एमआयआय (Market Infrastructure Institutions MII) सोबत झालेल्या चर्चेच्या आधारे ही मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या कालावधीत जे डिमॅट खातेधारक आतापर्यंत त्यांच्या डिमॅट खात्याचे केवायसी करू शकले नाहीत त्यांना केवायसी करावे लागेल. केवायसी साठी पुन्हा मुदत वाढवून मिळणार नसल्याचे एनएसडीएल कडून जाहीर करण्यात आले आहे. 1 जून 2021 पासून नवीन उघडलेल्या डिमॅट खात्यासाठी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसे न केल्याने डिमॅट ट्रेडिंग खातेधारकाचे खाते बंद होऊ शकते. ब्रोकरेज हाउसेस त्यांच्या खातेधारकांना दर तीन महिन्यांनी केवायसी अपडेट करण्याचा सल्ला देत असतात.

केवायसी अपडेटसाठी कोणती माहिती गरजेची

डिमॅट अकाउंट मध्ये तुमची इन्कम रेंज, मोबाईल नुंबर, ई मेल आयडी इत्यादी माहिती अपडेट करणे अनिवार्य  असते. जर तुम्ही तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते अपडेट केले नाही तर ते खाते बंद होते. एनएसडीएलनुसार (NSDL) डिमॅट आणि ट्रेडिंग खाते असलेल्या खातेधारकांना केवायसी करताना नाव, पत्ता, पॅन डिटेल्स, ईमेल आयडी, आणि वार्षिक उत्पनाची माहिती द्यावी लागते. हि माहिती दिल्यास तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते सुरु राहते.  
आपले डिमॅट खाते नियमितपणे सुरु ठेवायचे असल्यास वेळेत केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी करण्यासाठी अजूनही 8 दिवस बाकी आहेत त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या.