Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST deadline for GTA : माल वाहतूक करणाऱ्या एजन्सी आता 31 मेपर्यंत भरू शकणार जीएसटी

GST deadline for GTA : माल वाहतूक करणाऱ्या एजन्सी आता 31 मेपर्यंत भरू शकणार जीएसटी

GST deadline for GTA : माल वाहतूक करणाऱ्या संस्थांना आता जीएसटी भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलीय. केंद्र सरकारनं माल वाहतूक संस्थांना चालू आर्थिक वर्षात सेवा पुरवठ्याच्या आधारावर ही जीएसटी भरण्याची मुदत वाढवलीय. आता 31 मेपर्यंत ते आपला जीएसटी भरू शकतील.

वस्तू आणि सेवा कर (GST) नियमांच्या अंतर्गत, माल वाहतूक एजन्सीजकडे (GTAs) सेवांच्या पुरवठ्याच्या (फॉरवर्ड चार्ज) आधारावर जीएसटी गोळा करण्याचा आणि भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र जर त्यांनी या पर्यायाचा वापर केला नाही, तर कर दायित्व 'रिव्हर्स चार्ज' यंत्रणेच्या अंतर्गत सेवा प्राप्तकर्त्याकडे हस्तांतरित केलं जातं. हा जीएसटीमधला एक महत्त्वपूर्ण नियम आहे.

सेवांच्या पुरवठ्याच्या आधारावर जीएसटीचा पर्याय

सेवांच्या पुरवठ्याच्या आधारावर जीएसटी भरण्याचा पर्याय आहे. या पर्यायानुसार, इनपुट टॅक्स क्रेडिटसह (ITC) 12 टक्के कर आणि इनपुट टॅक्स क्रेडिटशिवाय 5 टक्के कर आर्थिक वर्षात भरावा लागतो. यासाठी माल वाहतूक संस्थांनी गेल्या आर्थिक वर्षातले फॉर्म 15 मार्चपर्यंत भरायचे होते. माल वाहतूक संस्था 31 मेपर्यंत आर्थिक वर्ष 2023-24साठी पर्याय वापरू शकतात. रस्त्यानं मालाची वाहतूक आणि या उद्देशासाठी बिल (कन्साइनमेंट नोट) जारी करण्याची सेवा देणार्‍या युनिटला जीएसटीच्या अंतर्गत जीटीए असं म्हणतात.

नियम म्हणजे काय?

माल वाहतूक संस्थांनी कोणत्याही आर्थिक वर्षात नवा व्यवसाय सुरू केला किंवा नोंदणीसाठी निर्धारित मर्यादा ओलांडली तर ती त्या आर्थिक वर्षात पुरवलेल्या सेवांवर जीएसटी भरणं निवडू शकते, असं यातली सुधारणा सांगते. यासंबंधी एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन यांनीही माहिती दिलीय. ते म्हणाले, की जीटीएकडे वस्तूंच्या पुरवठ्यावर किंवा पुरवठा पावतीच्या आधारावर (रिव्हर्स चार्ज) कर भरण्याचा पर्याय असतो. या दोघांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत.

तपशीलवार नोंदींची गरज नाही

समान पुरवठ्याच्या आधारावर, करदात्यांना टॅक्स क्रेडिट वापरण्याची आणि केवळ मूल्यवर्धित कर भरण्याची परवानगी असते, असं रजत मोहन यांनी सांगितलं. दुसरीकडे, 'रिव्हर्स चार्ज'च्या नियमानुसार कर भरण्यासाठी तपशीलवार नोंदी ठेवण्याची आवश्यकता नसते. कराच्या स्वरूपात अडकलेलं खेळतं भांडवलही यानिमित्तानं मुक्त होईल.

जीएसटी कर आणि प्रकार

देशात एकच प्रकारचा टॅक्स असावा, या उद्देशानं केंद्र सरकारनं सुरू केलेला हा करप्रकार आहे. जीएसटीच्या आधी विविध प्रकारचे 32 कर होते. व्हॅट, एक्साइज, इन्कम टॅक्स, गिफ्ट टॅक्स, पालिकेचा टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स अशा काही करप्रकारांचा यात समावेश होता. मात्र यातला क्लिष्ट प्रकार काढून जीएसटी हा एकच कराचा प्रकार सरकारनं सुरू केला. जुलै 2017पासून या कराच्या आकारणीस सुरुवात झाली. 

महाराष्ट्र अव्वल

जीएसटीचे देखील विविध प्रकार आहेत. सीजीएसटी, एसजीएसटी, यूटीजीएसटी, आयजीएसटी आदी. या वस्तू आणि सेवा करासाठी नोंदणी प्रक्रिया आहे. त्यासाठी सरकारच्या www.gst.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपलं रजिस्ट्रेशन करता येवू शकतं. त्यात विविध प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याचा लाभ आपल्याला घेता येईल. दरम्यान, जीएसटी हा केंद्र सरकारमार्फत आकारला जाणारा करप्रकार आहे. या करसंकलनात विविध राज्यांचा विचार करता महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक येतो. जीएसटी करप्रकार सुरू झाल्यापासून सातत्यानं जीएसटी भरणा करण्यात राज्य अग्रेसर असल्याचं दिसून आलंय. एप्रिल 2023च्या आकडेवारीतही राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचं दिसून आलं.