Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FPI Investment: परदेशी गुंतवणुकदारांनी आयटी कंपन्यांकडे फिरवली पाठ, 72 हजार कोटींचे शेअर्स विकले!

Share Market

FPI investment decreased: परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी आयटी क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. आत्तापर्यंत, तब्बल 72 हजार कोटींचे शेअर्स विकले आहेत. तर सध्या मेटल, मायनिंग,बांधकाम आदी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली आहे.

FPI investors withdraw of investments in the IT sector: आर्थिक मंदीच्या भीतीने परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदार आयटी क्षेत्रातील (FPI: Foreign portfolio investors) आयटी कंपन्यांमधील त्यांचे शेअर्स काढून घेत आहेत. 2022 पासून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी आयटी कंपन्यांचे शेअर्स विकत आहेत. तर, मेटस, मायनिंग, बांधकाम, तेल आणि गॅस कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. 

आयटी क्षेत्राकडील कल का घटला? (Why the trend towards IT sector has decreased?)

2022 वर्षात, 5 टक्क्यांहून अधिक आयटी (IT) क्षेत्रातील परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी (FPI) शेअर्स विकले होते. हाच ट्रेंड 2023 च्या सुरुवातीलाही दिसून येत आहे. 2021 वर्षात परकिय गुंतवणुकदारांचा आयटी क्षेत्रातील वाटा 15.45 टक्के होता. जो सध्या 10.45 टक्क्यांवर गेला आहे. इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो सारख्या कंपन्यांसह आयटी क्षेत्रातील या बलाढ्य कंपन्यांचे 72 हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकलेले आहेत.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आर्थिक मंदीच्या भीतीने परदेशी फंड व्यवस्थापकांनी (Foreign Fund Manager) आयटी कंपन्यांचे शेअर्स विकण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला युरोप आणि अमेरिकेसह जगातील इतर अनेक देशांतील आर्थिक मंदीमुळे आयटीवरील खर्च कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे परदेशी फंड मॅनेजर आयटी कंपन्यांचे शेअर्स विकत होते.

निफ्टी आयटी निर्देशांक (Index) 2022 मध्ये 25 टक्के घसरला होता. तर, निफ्टीने या कालावधीत 1 टक्का वाढ नोंदवली आहे. कमकुवत रुपया आणि आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अ‍ॅट्रिशन रेटमध्ये घट झाल्यामुळे आयटी कंपन्यांचे मार्जिन किंचित सुधारले आहे, परंतु 2023 मध्ये महसूल वाढ कमी होण्याची शक्यता असल्याने, परदेशी फंड व्यवस्थापक आयटी कंपन्यांचे शेअर्स विकत आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञ विवेक नाडकर्णी यांचे  म्हणणे आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात आयटी कंपन्यांचे उत्पन्न कमी होण्याची अपेक्षा आहे. आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांचा व्यवसाय वाढीचा अंदाज 8 टक्क्यांवरून 6 ते 7 टक्क्यांवर आली आहे, अर्थात 1 ते 2 टक्क्यांनी व्यवसायात घट होणार आहे. यामुळेच आयटी कंपन्यांकडे असणारा कल कमी झालेला आहे.

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील 72 हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकून मेटल आणि मायनिंग कंपन्यांमधील त्यांचा हिस्सा वाढवला आहे. यासोबतच वाहन आणि वाहन उपकरणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही त्यांचा वाटा लक्षणीय वाढला आहे. यामुळे देशांतर्गत गुंतवणुकदारांनीही या कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे आणि आयटीतील शेअर्स विकत असल्याचे दिसत आहेत, यासह एकूणच आयटी कंपनीत गुंतवणुकीचा कल कमी झाला आहे, असे नाडकर्णी यांनी सांगितले महामनीला सांगितले.