Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Navy: भारतीय नौदलामध्ये पहिल्यांदाच महिलांना मिळणार 'कमांडो' होण्याची संधी

Indian Navy

Image Source : www.instagram.com

Indian Navy MARCOS for Women: भारतीय नौदलाने (Indian Navy) एलिट स्पेशल फोर्समध्ये (Elite Special Forces) महिलांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Indian Navy Opens up Special Forces for Women: भारतीय नौदलाने (Indian Navy) एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून स्पेशल फॉर्सेसमध्ये आता महिलांनाही ‘कमांडो’ (Commando) म्हणून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. नौदलाने (Indian Navy) एलिट स्पेशल फोर्समध्ये (Elite Special Forces) महिलांचा समावेश करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रविवारी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एका खाजगी वाहिनीला या संदर्भात माहिती दिली. मात्र अद्याप या  निर्णयाची अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच यासंबंधित ऐतिहासिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

पहिल्यांदाच महिलांना मिळणार कमांडो होण्याची संधी

भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये असणाऱ्या कमांडोंना (Commando) कठोर प्रशिक्षण दिले जाते. या अगोदर या पदाकरिता फक्त पुरुषांनाच संधी देण्यात येत होती मात्र यापुढे महिलांनाही कमांडो होण्याची संधी मिळणार आहे. या अधिकाऱ्यांवर विशेष आणि गुप्त ऑपरेशन्स करण्याची जबाबदारी असते. 

थेट विशेष दलात सहभागी न करता 'स्वयंसेवक' म्हणून करावे लागेल काम 

महिलांना देण्यात येणारे प्रशिक्षणाचे निकष पूर्ण केल्यानंतर त्यांना नौदलात मरीन कमांडो ( Marine Commandos) म्हणजे मार्कोस (MARCOS) होण्याची संधी मिळणार आहे. परंतु कोणालाही थेट विशेष दलात (Special Forces) सामील न करता महिला कमांडोंना 'स्वयंसेवक' म्हणून काम करावे लागणार आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणाऱ्या महिला अधिकारी (Officer) आणि नाविक (Sailors) यांना मार्कोस (MARCOS) प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात येईल. 

मार्कोस म्हणजे नक्की काय? (What is MARCOS) - Marine Commandos)

मरीन कमांडोलाच ‘मार्कोस’ (Marcos) असे म्हटले जाते. मरीन कमांडो हा नौदलातील स्पेशल फोर्स कमांडो आहे. यांना अनेक विशेष मोहिमांसाठी प्रशिक्षित केले जाते. हे कमांडो लष्करी तळावर, शत्रूच्या युद्धनौकांवर हल्ले करतात आणि विशेष गुप्त मोहिमा पार पाडतात.