First Solar investment in India: जगभरातील कंपन्या भारताला गुंतवणूक डेस्टिनेशन म्हणून पाहत असताना आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. अमेरिकेतली बलाढ्य फर्स्ट सोलार ही कंपनी भारतामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. विशेष म्हणजे ही कंपनी सोलार पॅनल स्वत: तयार करते. पॅनल निर्मिती करताना चीनची मदत घेतली जात नाही. अमेरिकेच्या ऊर्जा सचिव जेनिफर गॅनहोल्म यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली.
नवीकरणीय ऊर्जा निर्मितीला वेग
फर्स्ट सोलार प्रकल्पामुळे भारतात सौर ऊर्जा निर्मितीला मोठा वेग येणार आहे. भारतामध्ये सोलार पॅनल निर्मितीची पुरेशी क्षमता विकसित झाली नाही. भारतीय कंपन्या सोलार उत्पादने निर्माण करताना चीन आणि इतर देशांतून पॅनल आणि इतर सुटे भाग आयात करतात. (First Solar investment in India) मात्र, आता भारतात फर्स्ट सोलार कंपनी उभी राहिल्यास देशी कंपन्यांना पॅनल येथेच उपलब्ध होतील. तसेच स्वस्तात सौरऊर्जा उत्पादने तयार होतील.
US डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून या प्रकल्पाला सहाय्य मिळणार आहे. या प्रकल्पाद्वारे सौर ऊर्जेवर चालणारी उत्पादनांची निर्मिती केली जाईल. क्लिन एनर्जी निर्मितीमध्ये भारत आणि अमेरिकेत सहकार्य करार झाला आहे. या प्रकल्पामुळे भारतात प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रोजगार निर्मिती देखील होईल. जगभरातील कंपन्या भारतामध्ये निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. ही मक्तेदारी पूर्वी चीनकडे होती. मात्र, कोरोनानंतर कंपन्यांनी "चीन+ 1" हे धोरण निर्मिती प्रकल्प सुरू करताना ठेवले आहे.
टेस्ला लवकरच भारतात येणार
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांच्यामध्ये भेट झाली होती. टेस्ला कंपनी भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. (First Solar investment in India) यावरही अमेरिकेच्या ऊर्जा सचिव जेनिफर गॅनहोल्म यांनी वक्तव्य केले. टेस्ला कंपनी लवकरात लवकर भारतात येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ग्रॅनहोल्म म्हणाल्या.
केंद्रीय ऊर्जा आणि वायू मंत्री हरदीप पुरी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के सिंग यांचीही अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांनी भेट घेतली. भारतामध्ये प्रकल्प आणण्याबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.