• 28 Nov, 2022 14:54

जाणून घ्या iPhone 14 Plus ची विक्री कधीपासून सुरू होणार आणि काय आहेत ऑफर!

iPhone 14 Plus Launch

iPhone 14 Plus Launch : ज्या ग्राहकांना आयफोन 14 प्लसच्या विक्रीची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे; कारण आयफोन 14 प्लस 7 ऑक्टोबरपासून मिळणार आहे.

iPhone 14 Plus Sell : आयफोन चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर. आयफोन 14 प्लसची विक्री शुक्रवारपासून (दि.7) सुरू होणार आहे. सध्या हा फोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवरून (Amazon & Flipkart E-Commerce Platform) प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो. अॅपलने अॅपल वॉच सिरिज 8, एअरपॉडस 2 आणि सोबतच आणखी काही प्रॉडक्टसह 7 सप्टेंबर रोजी आयफोन 14 ची सिरिज लॉन्च केली होती. त्यानंतर बरोबर एक महिन्याने iPhone 14 Plus ग्राहकांना मिळणार आहे.

आयफोन 14 प्लस व्यतिरिक्त, फार आऊट इव्हेंटमध्ये लॉन्च केलेले बाकी प्रॉडक्ट सप्टेंबर महिन्यातच ग्राहकांसाठी उपलब्ध होते. आयफोन14, आयफोन14 प्रो, आयफोन14 प्रो मॅक्स सोबत अॅपल वॉच सिरिज 8 आणि नवीन अॅपल वॉच SE सप्टेंबरमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. अॅपल वॉच अल्ट्रा आणि एअर पॉडस प्रो सप्टेंबरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. आता आयफोन 14 प्लसच्या विक्रीची प्रतीक्षा होती जी आता 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल. (The sale of iPhone 14 Plus will start from October 7)

क्रॅश डिटेक्शन हे नवीन फीचर कोणत्या देशाला सपोर्ट करणार? 

आयफोन 14 प्लसची किंमत 89,900 रुपये आहे आणि 6.7-इंचाचा डिस्प्ले, A15 बायोनिक चिप, चांगले कॅमेरे आणि बरेच काही अडवांस फीचर आहे. फोन कार क्रॅश शोधणे, यूएस(US) आणि कॅनडामधील(CANDA) उपग्रहाद्वारे एमर्जेन्सी मजकूर पाठवणे इत्यादी गोष्टी शक्य होईल. 

फ्लिपकार्टवर आयफोन 14 प्लसची किंमत

आयफोन 14 प्लस ,(128 GB) फ्लिपकार्टवर प्री-ऑर्डरसाठी Rs.89,900 मध्ये उपलब्ध आहे. (256GB) व्हेरिएंट 99900 रुपयांमध्ये बुक करता येईल. तर फोनच्या (512GB) वेरिएंटची किंमत 119900 रुपये आहे.(Flipkart)

अमेझॉन वर आयफोन 14 प्लस ची किंमत आयफोन 14 प्लसचा बेस व्हेरिएंट (128 GB) सध्या अमेझॉनवर उपलब्ध नाही. आयफोन 14 प्लस (256GB) 99900 रुपयांमध्ये बुक केला जाऊ शकतो. तर (512 GB) व्हेरिएंट 119900 रुपयांमध्ये बुक करता येईल. तुम्ही एक्सचेंजवर खरेदी केल्यास तुम्हाला 16350 रुपयांची सूट मिळू शकते. अॅमेझॉन फोनवर अनेक बँक ऑफर्सही देत आहे. (Amazon offers) 

फ्लिपकार्टप्रमाणेच अमेझॉन देखील फोनवर एक्सचेंज ऑफर देत आहे. तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, तुम्ही काही रुपयापर्यंत बचत करू शकता. फोनवर 19900 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. (Exchange Offer)