Traffic challan: अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकी बाबत अनेक नियम लागु केले आहेत. अपघात तर वाढलेच पण त्या बरोबरच वाहनांची संख्या सुद्धा भरारीने वाढली आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंड (Traffic challan) भरावा लागतो. मोबाईलवर बोलत असताना गाडी चालवल्यास 1000 रुपयांऐवजी 5000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. दारू पिऊन गाडी चालवल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. अशा प्रकारे अनेक नियम आहेत ते जाणून घेऊया.
वाहतुकीचे नियम (Traffic rules)
वाहतुकीचे नियम पाळणे खूप महत्वाचे आहे आणि ते प्रत्येकाने पाळायला पाहिजे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, ड्रायव्हिंग करताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, RC, इन्शुरन्स सर्टिफिकेट, परमिट सर्टिफिकेट (Driving License, RC, Insurance Certificate, Permit Certificate) असणे आवश्यक आहे. यापैकी कोणताही ट्रॅफिक नियम मोडल्यास, तुम्हाला पुढील चलान भरावे लागेल.
- आरसीशिवाय गाडी चालवल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
- ड्रायव्हिंग लायसन्स (DL) शिवाय गाडी चालवल्यास 5000 रुपये दंड आकारला जाईल.
- विम्याशिवाय गाडी चालवल्यास 5,000 रुपये दंड आहे, तसेच तीन महिने कारावास.
- अल्पवयीन वाहन चालवताना पकडल्यास पालकांना 25 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
- हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल.
- ओव्हरस्पीडिंगसाठी 2000 रुपयांपर्यंत दंड आहे.
- सीट बेल्ट न लावता गाडी चालवल्यास 1000 रुपये दंड आकारला जातो.
- वाहनाच्या ओव्हरसाइजिंगसाठी 5000 रुपये दंड आहे.
- परमिटशिवाय गाडी चालवल्यास 10 हजार रुपये दंड आहे.
- दारू पिऊन गाडी चालवल्यास 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास.
- दुसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवल्यास15,000 रुपये दंड आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार….. (According to the Motor Vehicle Act….)
नवीन खरेदी केलेल्या कार किंवा बाइकवर तात्पुरता नोंदणी क्रमांक असणे अनिवार्य आहे. नोंदणी क्रमांकाशिवाय सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवणे बेकायदेशीर आहे. तात्पुरत्या नंबर प्लेटची व्हॅलिडिटी संपल्यानंतर जर ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला पकडले, तर तुम्हाला (वाहन मालकाला) 5,000 रुपयांपर्यंतचे चलन भरावे लागेल किंवा वाहन जप्त केले जाऊ शकते.