• 07 Dec, 2022 08:36

Driving License: ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Driving License

Driving License: मोटार वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. आधी लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स बनवले जाते आणि त्यानंतर कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स बनवले जाते. ते आता तुम्ही घरबसल्या सुद्धा काढू शकता, त्यासाठी काय करावे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Apply for driving license: मोटार वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. आधी   लर्नर  ड्रायव्हिंग लायसन्स बनवले जाते आणि त्यानंतर कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स बनवले जाते. काही लोकांना हे काम त्रासदायक वाटेल पण प्रत्यक्षात तसे नाही. लर्नर  ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे आता सोपे झाले आहे. लर्नर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. याद्वारे तुम्ही लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या मिळवू शकता. तुम्हाला आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही किंवा कोणत्याही एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत. लर्नर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्ही अगदी आरामात घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन परीक्षाही देऊ शकता. 

[media url="https://www.youtube.com/watch?v=_7zYPvhaUCw"][/media]

लर्नर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे,

 लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन अर्ज

 • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुमचे राज्य निवडा. 
 • Apply for a Learner's License वर क्लिक करा.
 • लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स फॉर्म भरा.मागितलेली आवश्यक माहिती भरा.
 • आधार कार्ड असलेल्या अर्जदाराची निवड करा.
 • आधार प्रमाणीकरणाद्वारे सबमिट करा वर क्लिक करा आणि सबमिट करा.
 • आधार कार्ड डिटेल्स  आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा. जनरेट OTP वर क्लिक करा.
 • नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा.
 • अटी व शर्ती एक्सेप्ट करा ऑथेंटिकेशन बटणावर क्लिक करा.
 • License fee  पेमेंट पर्याय निवडा.ऑनलाइन टेस्टसाठी  वेळ आणि तारीख निवडा.
 • त्यानंतर, ऑनलाइन टेस्ट द्या.
 • टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्ममेशन मिळेल.