Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning: वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत 'या' 5 गोष्टी केल्या, तर पुढील आयुष्य जाईल आरामात

Financial planning

Financial Planning: वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण होते, त्यानंतर 25 ते 30 या कालावधीत बचत आणि गुंतवणूक करण्यावर प्रत्येकाने भर द्यायला हवा.वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत तुम्ही ठराविक गोष्टी नियोजनाने केल्या, तर पुढील आयुष्य आरामात आणि सुखात जगात येऊ शकते.

आयुष्य आरामात जगायचे असेल, तर  आर्थिक नियोजन (Financial planning) पक्के असणे गरजेचे आहे. हल्ली अनेकांना नोकरीतून लवकर निवृत्त होऊन स्वतःचा व्यवसाय करायचा असतो. मात्र त्यासाठी योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यातील वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काही गोष्टींचा चोख पद्धतीने अवलंब केला, तर भविष्यात आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही.

महाविद्यालयीन शिक्षण वयाच्या 24 ते 25 व्या वर्षापर्यंत पूर्ण होते. त्यानंतर वयाची पंचविशी ते तिशी हा तरुणांसाठी अतिशय महत्त्वाचा काळ असतो. याच कालावधीत बचत करता येते, आर्थिक गुंतवणूक सहज पद्धतीने करता येते. त्यामुळे आजच्या लेखातून आपण वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत कोणत्या 5 गोष्टी करायला हव्यात, जाणून घेऊयात.

गुंतवणुकीचे प्लॅन निश्चित करा (Determine the investment plan)

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर  तरुणांना नोकरी लागते. याच नोकरीतून त्यांना महिन्याला निश्चित पगार मिळतो. या पगारातून अगदी सुरुवातीपासून तरुणांनी बचत आणि गुंतवणूक करायला शिकले पाहिजे. वयाच्या तिशी पर्यंत गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आणि कर सवलतीचा विचार करून पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवायला हवेत.

तुमची ही गुंतवणूक शॉर्ट (Short) आणि लॉंग टर्म (Long Term) स्वरूपाची असायला हवी. सध्या PF, PPF, SCSC, NPS, म्युच्युअल फंड, पोस्टातील वेगवेगळ्या योजना, शेअर्स आणि बँकेतील एफडी यासारखे अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. यातून सर्वाधिक परतावा मिळवता येऊ शकतो.

लवकरात लवकर लग्न करा (Get married as soon as possible)

होय हे खरे आहे. लवकर लग्न केल्याने आर्थिक गुंतवणूक करण्यास मदत होते. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. उशिरा लग्न झाल्याने शारीरिक, मानसिक आणि आर्थिक खर्च वाढू शकतात. याउलट लवकर लग्न झाले, तर दोघेही मिळून बचत आणि गुंतवणूक करू शकतात. यातून मोठा फंड तयार केला जाऊ  शकतो. ज्याच्या मदतीने तुम्ही इतर गोष्टी सहज साध्य करू शकता. दोघांच्या कमाईतून तुम्ही मोठी आर्थिक गुंतवणूक आणि बचत करु शकता.

इमर्जन्सी फंड तयार करून ठेवा (Prepare an emergency fund)

इमर्जन्सी फंड हा अतिशय महत्त्वाचा फंड आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हा फंड वापरता येतो. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या किमान 6 महिन्या इतकी रक्कम तुम्ही इमर्जन्सी फंडात ठेवायला हवी. ही रक्कम आपत्कालीन परिस्थिती जसे की, अचानक नोकरी जाणे अशा परिस्थितीतच खर्च करावी.वार्षिक आधारावर इमर्जन्सी फंडातील रक्कम वाढवत न्यावी.जेणेकरून समजा पंचविशीत सुरुवात केल्यास तिशी पर्यंत मोठी रक्कम तयार होऊ शकते.

सोन्यात गुंतवणूक करा (Invest in gold)

सोन्यात गुंतवणूक करणे हा अतिशय पारंपरिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिला जातो. वयाच्या तिशी पर्यंत तुम्हाला जमेल तितके सोने खरेदी करा. जेणेकरून याच सोन्याचा वापर करून तुम्ही भविष्यात इतर गोष्टी साध्य करू शकता. सोन्यातील गुंतवणूक ही कधीही तोट्याची ठरत नाही. खरेदी केलेले सोने वेळप्रसंगी गहाण ठेवून किंवा मोडून पैसे उभारतात येतात. कर्ज घेण्याऐवजी हा पर्याय सर्वोत्तम ठरतो.

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करा (Plan your finances after retirement)

जर तुम्हाला देखील नोकरीतून लवकर निवृत्त व्हायचे असेल, तर निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे आर्थिक नियोजन करायला घ्या. तुम्हाला सध्या मासिक किती उत्पन्न मिळते, तुमचा खर्च किती होतो, हे लक्षात घेऊन निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे प्लॅनिंग करा. त्यासाठी आतापासून ठराविक रक्कम निवृत्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवा. नोकरीतून निवृत्त झाल्यावर याच रकमेचा वापर करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता किंवा तुमच्या इतर इच्छा पूर्ण करू शकता.