Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning for Wedding: लग्नाचा खर्च आटोक्यात आणून धुमधडाक्यात लग्न करायचे असेल, तर 'या' 5 टिप्स नक्की फॉलो करा

Financial Planning for Wedding

Image Source : www.weddingbazaar.com

Financial Planning for Wedding: प्रत्येकालाच स्वतःचे लग्न धुमधडाक्यात साजरे करायचे असते. आई-वडील आपल्या मुलांच्या लग्नासाठी आर्थिक गुंतवणूक करून ठेवतात. मात्र योग्य पद्धतीने लग्नाच्या खर्चाचे नियोजन न केल्याने अनेकदा लग्नाचा खर्च भागवण्यासाठी कर्ज (Loan) काढण्याची वेळ येते. अशी परिस्थिती तुमच्यावरही येऊ नये, याकरिता आर्थिक नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जात असल्या, तरी लग्नाचा खर्च हा पृथ्वीवरच करावा लागतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या सुखद क्षणांपैकी एक गोष्ट म्हणजे 'लग्न' (Wedding). महाराष्ट्रात लग्नासाठी किमान 10 लाख रुपये खर्च केला जातो, तर जास्तीत जास्त ही रक्कम लाखो-कोटींमध्ये जाते. हौसेला मोल नसतं, ते काही उगाच नाही.

आई-वडील मुलांच्या लग्नासाठी त्यांच्या जन्मापासूनच एक-एक रुपया साठवून ठेवतात. मात्र योग्य पद्धतीने लग्नाच्या खर्चाचे नियोजन न केल्याने अनेक वेळा लग्नाचा खर्च भागवण्यासाठी कर्ज (Loan) काढण्याची वेळ येते. अशी परिस्थिती तुमच्यावरही येऊ नये, याकरिता आर्थिक नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही कमी खर्चात धुमधडाक्यात लग्न करू शकता.

follow-these-tips-to-keep-your-wedding-expenses-under-control.jpg

ऑफ सीजन लग्न करा (Get married off season)

भारतात प्रामुख्याने दिवाळीनंतर लग्नाचा सीजन सुरु होतो, जो जून- जुलै पर्यंत चालतो. हा कालावधी लग्नाचा पीक सीजन म्हणून ओळखला जातो. या दरम्यान सर्वच गोष्टी जसे की, हॉल, केटरिंग, डेकोरेशन इ. गोष्टींची किंमत वाढलेली असते. त्यामुळे यादरम्यान लग्न करण्यापेक्षा ऑफ सीजन (Off Season) लग्न करणे केव्हाही फायद्याचे ठरते. ऑफ सीजनमध्ये लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टींची किंमत तुलनेने कमी झालेली असते. ज्यामुळे तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी कमी किंमतीत बुक करता येतात.

लवकर बुकिंग करा (Book early)

लग्नकार्यात मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट, डेकोरेटर, मिठाईवाला इ. लोकांना तुमच्या लग्नाच्या तारखेच्या ऐनवेळी बुक करू नका. ऐनवेळी केलेले बुकिंग अतिशय महाग पडू शकते. याउलट तुमच्या लग्नाच्या तारखेच्या किमान 2 महिन्यापूर्वी बुकिंग करायला सुरुवात करा. जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी चांगले बार्गेनिंग करून चांगला डिस्काउंट मागू शकता.

डिजिटल पत्रिकांना प्राधान्य द्या (Prefer digital invitation)

लग्न समारंभात पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी पत्रिका छापल्या जातात. ज्यामध्ये लग्नातील कार्यक्रमाचा डिटेल प्लॅन देण्यात आलेला असतो. सध्या मार्केटमध्ये 2 रुपयांपासून पत्रिका छापल्या जातात. लाखो रुपयांच्या पत्रिकाही सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र गेल्या काही वर्षात डिजिटल पत्रिका पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावर एकाच वेळी अनेकांना डिजिटल पत्रिका पाठवली जाते. तसेच कमी खर्चात ही पत्रिका बनवून होते. व्हिडीओ फॉरमॅट किंवा टेक्स्ट स्वरूपात ही पत्रिका बनवली जाते.

कपड्यांवरील खर्च कमी करा (Reduce spending on clothing)

लग्न समारंभात हल्ली ट्रेंडनुसार मॅचिंग कपडे (Matching clothes) घालण्याची पद्धत पाहायला मिळत आहे. आपण लग्नात अधिक आकर्षित दिसावे यासाठी लोक ब्रँडेड अशा महागड्या दुकानांमधून ककपड्यांची खरेदी करतात. वधू वराचे लग्नाचे कपडेच हजारो-लाखो रुपयांचे असतात. बहुतांश वेळा असे पाहायला मिळाले आहे की, लग्नातील कपड्यांचा पुनर्वापर करता येत नाही. त्यामुळे एका दिवसासाठी लाखो रुपये खर्च करणे खरंच योग्य आहे का? याचा विचार करणे गरजेचे आहे. यावर उपाय म्हणून  कपड्याचे बजेट निश्चित करायला हवे आणि याच बजेटमध्ये कपड्यांची खरेदी करायला हवी.

जेवणाचा मेन्यू फिक्स ठेवा (Keep the food menu fixed)

लग्नामध्ये अनेकजण अनलिमिटेड मेन्यू ठेवतात. ज्यामध्ये स्टार्टर (Starter), मेन कोर्स (Main course) आणि स्वीटस (Sweets) असे सेक्शन करण्यात आलेले असतात. अनलिमिटेड मेन्यू या संकल्पनेमध्ये बऱ्याच वेळा जेवण वाया जाते. मुळात या मेन्यूसाठी आपण पर प्लेट पैसे दिलेले असतात. त्यामुळे ठराविक मेन्यू निवडणे कधीही चांगले. यामुळे बजेटही सांभाळले जाते आणि जेवणही वाया जात नाही.