Swiss Bank Update: आपण सगळेच स्विस बँकेला(Swiss Bank) ब्लॅक करन्सीसाठी(Black Currency) ओळखतो. नुकतीच या बँकेसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बँक आता डबघाईला आल्याचे समोर आले असून अनेक मोठ्या व्यक्तींचे आणि उद्योगपतींचे खाते असणाऱ्या स्विस बँकला त्यांच्या इतिहासातला (Swiss Bank Economic Crisis) सर्वात मोठा फटका बसला आहे. नेमकं काय झालायं? चला जाणून घेऊयात.
नेमकं काय झालायं?
रॉयटर्स(Reuters) वृत्त संस्थेने यासंदर्भात खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव स्विस बॅंक(Swiss Bank) चर्चेत आहे. स्विस नॅशनल बँकेला गेल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे खुद्द बँकेने सोमवारी(9 जानेवारी) पोस्ट लिहून सांगितले आहे. रॉयटर्स वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे बँकेला 2022 मध्ये 132 अब्ज स्विस फ्रँक म्हणजे 143 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. बँकेच्या 116 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
प्राथमिक आकडेवारीचा संदर्भ देऊन स्विस नॅशनल बँकेने सोमवारी 2022 मध्ये आर्थिक वर्षासाठी 132 अब्ज स्विस फ्रँकचे नुकसान जाहीर रित्या नोंदवले आहे. स्वित्झर्लंडच्या अंदाजे 18 टक्के 744.5 अब्ज स्विस फ्रँक्सच्या(Swiss Franc ) अंदाजे सकल देशांतर्गत उत्पादनाच्या बरोबरीचे आहे. 2015 मध्ये त्याचे पूर्वीच्या रेकॉर्डनुसार नुकसान 23 अब्ज फ्रँक इतके होते.
स्विस बॅंकेने यावर काय स्पष्टीकरण दिले आहे?
याविषयी पोस्ट करताना बँकेने सांगितले आहे की, स्टॉक (Stocks) आणि स्थिर उत्पन्न बाजारातील घसणीमुळे बँकेचे शेअर्स आणि बाँड पोर्टफोलिआच्या(Board Portfolio) मुल्याला नुकसान पोहोचले आहे. त्याचबरोबर मजबूत होत असलेल्या स्विस फ्रँकचाही नकारात्मक परिणाम झाला असून फ्रँक वाढल्याने विदेशी चलन पोझिशनवर 131 अब्ज फ्रँक आणि स्विस फ्रँक पोझिशन्सवर 1 अब्ज इतके गमवावे लागले आहेत.
अर्थतज्ञांचे यावर म्हणणे काय?
स्विस बँकेला झालेल्या तोट्याचे वेगवेगळ्या आर्थिक दृष्टिकोनातून विश्लेषण करण्यात येत आहे. एसएनबी(SNB) वर गेल्या वर्षी त्याच्या स्टॉक आणि बाँड पोर्टफोलिओमध्ये झालेल्या नुकसानीमुळे बाजारातील व्यापक मंदीचा परिणाम पाहायला मिळाला होता. मजबूत स्विस फ्रँक ते जुलैमध्ये युरोच्या तुलनेत समानतेने वाढले होते. एसएनबी(SNB) चे सोने 2021 च्या शेवटी 1,040 टन होते आणि 2022 मध्ये 400 दशलक्ष फ्रँकने वाढले होते.