देशातील बर्याच बँका या त्यांच्या चांगल्या क्रेडिट स्कोर (Credit Score) असणाऱ्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देतात. तसेच, क्रेडिट कार्ड घेण्याच्या प्रक्रियासुद्धा खूप सोपी झाली आहे. म्हणूनच, यावेळी मोठ्या संख्येने लोक क्रेडिट कार्ड वापरत आहेत. आजच्या काळात, यूपीआय व्यतिरिक्त, लोक पेटीएम (Paytm), फोनपे (PhonePe), मोबिक्विक (Mobikwik), अँमेझॉन पे(Amazon Pay) सारख्या ई-वॅलेट्सचा डिजिटल पेमेंटसाठी वापर करत आहेत. काहीजण ई-वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने (Credit Card) पैसे अँड करतात आणि नंतर ते लहान-लहान पेमेंटसाठी वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का? ई-वॉलेटमध्ये (E Wallet) क्रेडिट कार्डने पैसे अँड करण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. ते कोणते? आणि काही प्रमुख ई-वॉलेट क्रेडिट कार्डने पैसे अँड करण्यासाठी शुल्क आकारतात. ते किती? ते आज आपण पाहूया.
Table of contents [Show]
पेटीएम अतिरिक्त शुल्क
पेटीएमच्या वेबसाइटनुसार, क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी 2.5 टक्के शुल्क आकारले जाते. तसेच, अमेरिकन एक्सप्रेस, कॉर्पोरेट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड वापरून वॉलेटमध्ये पैसे लोड केल्यावर 3% शुल्क आकारले जाते. जे वापरकर्ते क्रेडिट, कॉर्पोरेट किंवा प्रीपेड कार्ड वापरून त्यांच्या वॉलेटमध्ये पैसे जोडतात आणि प्रति महिना 5,000 रुपये प्रति महिना किंवा त्याहून अधिक रकम बँक खात्यात हस्तांतरित करतात त्यांना 2 टक्क्यांपर्यंतचा अधिभार लागू होतो.
फोनपेमध्ये 2.65% पर्यंत अतिरिक्त शुल्क
पेटीएमच्या वेबसाइटनुसार, क्रेडिट कार्डद्वारे फोनपे वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी 2.65 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
अँमेझॉनपेची सुविधा बंद
ई-कॉमर्स कंपनी अँमेझॉनच्या पेमेंट युनिट अँमेझॉन पे वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डसह पैसे लोड करण्याची प्रक्रिया थांबविली गेली आहे. मात्र, आपण डेबिट कार्ड, नेटबँकिंग आणि यूपीआयद्वारे पैसे लोड करू शकता.
मोबिक्विक शुल्क आकारत नाही
मोबिक्विक वॉलेटमध्ये, दरमहा आपण क्रेडिट कार्डसह 2500 रुपयांची भर घातली तर त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही.
हा आहे फायदा
क्रेडिट कार्डद्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या व्यतिरिक्त, रिपेमेंटसाठी सुमारे 45 दिवसांचा कालावधी मिळतो, ज्यासाठी कोणतेही व्याज द्यावे लागत नाही. तसेच, बर्याच क्रेडिट कार्डवर काही प्रमाणात खर्च केल्यानंतर, आपली वार्षिक देखभाल फी परत केली जाते. या व्यतिरिक्त, क्रेडिट कार्डसह ई-वॉलेटमध्ये पैसे जोडण्यासाठी बर्याच वेळा कॅशबॅक उपलब्ध असतं.
हे आहे नुकसान
क्रेडिट कार्डने ई-वॉलेटमध्ये पैसे अँड केल्यास अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागू शकते. जर तुम्ही ई-वॉलेटमध्ये 100 रुपये जोडले तर तुम्हाला 2-5 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.